‘ऑपरेशन मनधरणी’नंतर आता भाजपकडून ‘ऑपरेशन समर्थन’ - माघार न घेतलेल्यांची समजूत काढणार; अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती करणार

मुंबई : बंडखोरांना पक्षाच्या छत्रछायेत परत आणण्यासाठी भाजपने राबवलेल्या ‘ऑपरेशन मनधरणी’ला मोठे यश मिळाल्यानंतर आता पक्षाने ‘ऑपरेशन समर्थन’ हाती घेतले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ज्या बंडखोरांनी माघार घेतली नाही, अशा अपक्ष उमेदवारांची नाराजी दूर करून त्यांचे समर्थन अधिकृत भाजप उमेदवाराला मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे मतफुटी टाळून महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचा भाजपचा मानस आहे.


राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपसह सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. अर्ज माघारीची मुदत संपण्यापूर्वी पक्षाने वरिष्ठ नेत्यांना पाठवून बंडखोरांची समजूत काढण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही अनेकांना फोन केले. त्यानंतर, बऱ्याच बंडखोरांनी माघार घेतली, मात्र काहीजण आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी, अनेक ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर पक्षाचेच अपक्ष बंडखोर रिंगणात उरले आहेत. आता या बंडखोरांना अनौपचारीकरित्या निवडणुकीतून बाजूला करून भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न ‘ऑपरेशन समर्थन’ अंतर्गत केला जाणार आहे.


महसूलमंत्री तथा भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “आम्ही शेवटपर्यंत बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता माघारीचे सर्व पर्याय संपले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची नाराजी आणि राग स्वाभाविक आहे. प्रत्येक इच्छुकाला तिकीट देणे शक्य नाही. आता झाले ते झाले विसरून, रिंगणात असलेल्या अधिकृत उमेदवारांचे समर्थन मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांची समजूत काढू.”
चंद्रपुरात उमेदवार यादी परस्पर बदलली


चंद्रपूर महापालिका निवडणुकीत उमेदवारांची यादी परस्पर बदलल्याप्रकरणी भाजपने जिल्हाध्यक्षांवर कठोर कारवाई केली आहे. त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात आले आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, “भाजपने ज्यांना उमेदवारी दिली आहे, ते शंभर टक्के निवडून येतील. मी स्वतः त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. सर्वांची समजूत काढली जाईल. आता तिकीटाचा विषय संपला आहे. भाजपचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.”



मित्रपक्षांविरोधातील लढतीचा महायुतीवर परिणाम नाही


राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत होत असली तरी याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, “मित्रपक्षांच्या विरोधात लढलो तरी महायुतीत कुठलेही मतभेद होणार नाहीत. समन्वय समितीच्या बैठकीत हे ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर टीका टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आतापर्यंतच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्ष किंवा नेत्यावर टीका केलेली नाही.”

Comments
Add Comment

Ajit Pawar Last Rites : पार्थ आणि जय पवारांनी दिली मुखाग्नी; शासकीय इतमामात अजित दादा अनंतात विलीन

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा आज बारामतीच्या मातीत शेवट झाला.

Stock Market Explainer: एक तासात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी 'खल्लास' तरीही दुपारपर्यंत बाजार का सावरत आहे?

मोहित सोमण: सुरूवातीच्या एक तासात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटींचे नुकसान झाले असले तरी पुन्हा एकदा शेअर बाजाराने

Ajit Pawar Passed Away : अजित पवार अमर रहे! साश्रू नयनांनी 'दादां'ना अखेरचा निरोप; बारामतीमध्ये उसळला जनसागर

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक

Ajit Pawar Last Rites : संसाराची अन् संघर्षाची साथ सुटली! सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट

बारामती : राजकारणाच्या आणि संसाराच्या प्रवासात ज्यांनी सावलीसारखी सोबत दिली, त्या आपल्या पतीला अजित पवारांना

आज संसदेत अर्थसंकल्पीय सर्वेक्षण २०२५-२६ सादर होणार 'या' क्षेत्रावर फोकस मोदी म्हणाले हा अर्थसंकल्प....

मोहित सोमण: आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचे अर्थसंकल्प सर्वेक्षण २०२५-२०२६ वर लक्ष केंद्रित असेल. भारतीय

अडीच वर्षांच्या संसारावर काळाचा घाला; पिंकी माळी यांचं विमान दुर्घटनेत निधन

मुंबई : विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी हिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काही