राज्यातील दहा महापालिकांमध्ये भाजपचे ४७ नगरसेवक बिनविरोध

मुख्यमंत्र्यांचे 'ऑपरेशन मनधरणी' यशस्वी; महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या पोहोचली ६४वर


मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याआधीच भाजप-महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे. राज्यातील १० महापालिकांमध्ये भाजपचे तब्बल ४७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर महायुतीला (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) एकूण ६४ जागा बिनविरोध मिळाल्या. यात शिवसेनेला १५, तर राष्ट्रवादीच्या २ जागांचा समावेश आहे.


महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरी आणि मित्रपक्षांतील नाराजीमुळे वातावरण तंग झाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन बंडखोरांशी संवाद साधला. साताऱ्यातील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही ते फोनवरून नाराज नेत्यांशी बोलताना दिसले. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना भविष्यात महापालिकेत स्वीकृत सदस्य किंवा राज्य-जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये संधी देण्याची हमी दिली. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून भाजपला सर्वाधिक ४७ जागा बिनविरोध मिळाल्या.



किती नगरसेवक बिनविरोध?



  1. कल्याण-डोंबिवली : भाजप १५, शिवसेना ६

  2. पनवेल : भाजप ७

  3. पुणे : भाजप २

  4. पिंपरी-चिंचवड : भाजप २

  5. जळगाव : भाजप ७, शिवसेना ६

  6. नागपूर : भाजप २

  7. ठाणे : शिवसेना ३

  8. भिवंडी : भाजप ६

  9. अहिल्यानगर : भाजप २, राष्ट्रवादी २

  10. धुळे : भाजप ४

  11. एकूण : महायुती ६४ (भाजप ४७, शिवसेना १५, राष्ट्रवादी २)


महायुतीचे मनोबल वाढले



  1. - पनवेल महापालिकेत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे ७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. उबाठा गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. यामुळे पनवेलमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला आहे. भाजपचे नितीन पाटील, रुचिता लोंढे, अजय बहिरा, दर्शना भोईर, प्रियंका कांडपिळे, ममता प्रितम म्हात्रे आणि स्नेहल ढमाले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

  2. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यात रंजना पेणकर (२६ ब), आसावरी नवरे (२६ क), मंदा पाटील (२७ अ), ज्योती पाटील (२४ ब), रेखा चौधरी (१८ अ), मुकंद तथा विशू पेडणेकर (२६ अ), महेश पाटील (२७ ड), साई शेलार (१९ क), दिपेश म्हात्रे (२३ अ), जयेश म्हात्रे (२३ ड), हर्षदा भोईर (२३ क), डॉ. सुनिता पाटील (१९ ब), पूजा म्हात्रे (१९ अ), रविना माळी (३० अ) आणि मंदार हळबे (२६ ड) यांचा समावेश आहे.

  3. जळगाव महापालिकेत महायुतीचे एकूण १३ उमेदवार (भाजप ७, शिवसेना ६) बिनविरोध निवडून आले. एकूण ७५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आता फक्त ६२ जागांवरच स्पर्धा राहिली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेत महायुतीचे ४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचे प्रत्येकी २ उमेदवार आहेत.

  4. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले यात जयश्री फाटक, सुखदा मोरे आणि एकता भोईर यांचा समावेश आहे. पुणे महापालिकेत प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी माणिकबाग) मधून भाजपचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपूरे बिनविरोध निवडून आले.

  5. या बिनविरोध निवडींमुळे निवडणुकीआधीच महायुतीचे मनोबल वाढले आहे. भाजपच्या सर्वाधिक ४७ बिनविरोध उमेदवारांमुळे २९ महानगरपालिकांपैकी बहुतांश ठिकाणी कमळ फुललेले दिसेल, असे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांचे निधन

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील माजी आमदार, अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचे

BMC Election 2026 : मुंबईत २२७ जागांसाठी १७०० उमेदवार भिडणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार

भायखळ्यात जाधव यांच्या नावावर नोंदवला गेला विक्रम

तिन्ही प्रकारच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवणाऱ्या पहिल्या उमेदवार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईत मनसेने दिले सहा अमराठी उमेदवार, मराठी इच्छुकांवर अन्याय

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उबाठा सोबत मनसेने युती केल्यानंतर मराठी भाषा

मुंबईतले बंडोबा झाले थंडोबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने इच्छुक उमेदवारांनी

कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणूक रिंगणात आता ४९० उमेदवार

डोंबिवली : कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणूक रिंगणात आता ४९० उमेदवार आहेत. मनपाच्या १२२ जागांसाठी या