संजय राऊत देशात अराजकता निर्माण करत आहेत; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

- आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली


मुंबई : उबाठा खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदांमधून अफवा पसरवून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. राऊत यांच्या वक्तव्यांमुळे देशाची बदनामी होत असल्याचा दावा करत त्यांच्या वक्तव्यांवर तीव्र टीका त्यांनी केली.


भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, संजय राऊत गॅस टंचाईबाबत सातत्याने चुकीची माहिती पसरवत आहेत. शहरांमध्ये गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर सुमारे २५ दिवसांत ग्राहकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी मर्यादित तुटवडा जाणवत असला तरी तो वितरकांकडून साठेबाजीमुळे निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.


केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत घरगुती गॅस सिलेंडरची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नोंदवलेल्या प्रत्येक मागणीप्रमाणे नागरिकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील परिस्थितीवर नियमित आढावा घेतला जात असल्याचेही बन यांनी सांगितले. इराणसह विविध देशांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सध्या सुमारे ४० देशांकडून कच्चे तेल आयात करत असून देशात पेट्रोल आणि डिझेलसाठी कुठेही मोठ्या रांगा लागलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.


गॅस टंचाईबाबत काँग्रेस, राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्याकडून सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही ठिकाणी जाणीवपूर्वक सिलेंडरची साठेबाजी होत असल्याचे सांगत अशा साठेबाजांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली :


मिठी नदीचा गाळ खाऊन कोण श्रीमंत झालं, मिठी नदीच्या गाळातून कोणी घर बांधले हे मुंबईकरांना माहित आहे. या घोटाळ्यातला दिनो मोरिया कोणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठी नदीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटलं याची इत्यंभूत माहिती सगळ्यांना आहे. संजय राऊत हे मिठी नदीचा वारंवार उल्लेख करून आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांना संपवायचं आणि संपूर्ण उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, याच साठी संजय राऊत मिठी नदी, मिठी नदी चा गाळ याबद्दल चर्चा होण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

WhatsApp Cloud Backup : WhatsApp आणणार स्वतःचे क्लाऊड बॅकअप; 2GB मोफत, अधिक स्टोरेजसाठी मोजावे लागतील पैसे

व्हॉट्सॲप लवकरच स्वतःची क्लाऊड स्टोरेज सेवा सुरू करण्याच्या तयारीत असून, यामुळे चॅट बॅकअपसाठी Google Drive आणि Apple iCloud

Vaishali Nagawade : रुपाली चाकणकर यांच्या जागी वैशाली नागवडे

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नियुक्ती; राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे मुंबई : राष्ट्रवादी

Nashik Crime : 'डायल 112' वर पोलिसांना फोन, घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनाही बसला मोठा धक्का ! नेमकं काय घडलं ?

Nashik Crime News : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी 'डायल 112' ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून

Heavy Rain India : देशभरात मुसळधार पावसाचा कहर; झारखंड-उत्तर प्रदेशात वीज कोसळून 16 जणांचा मृत्यू

Heavy Rain India : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी

Jalgaon Accident : टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Jalgaon Accident : जळगाव शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी घडलेल्या

Vehicle Insurance : गाडी चालवणाऱ्यांची धाकधूक वाढली! आता पेट्रोल पंपावर होणार 'ही' मोठी तपासणी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली : रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, वैध विमा