भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


नागपूर येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह यांनी साकारलेल्या २०० फूट उंच भारतीय राष्ट्रध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी आमदार संदीप जोशी आणि विकास ठाकरे, महापौर नीता ठाकरे, प्रभारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी बी, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आदी उपस्थित होते.



काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?


परदेशात त्या - त्या देशांचे राष्ट्रध्वज उभारल्याचे दिसत होते. राष्ट्रभिमान जागविण्यासाठी भारतातही राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, अशी मागणी व्हायची मात्र, त्याला फ्लॅग कोडची अडचण येत होती. ती अडचण दूर झाल्याने देशात भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहेत. नागपुरातील या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर उभारण्यात आलेला हा राष्ट्रध्वज प्रत्येक नागपूरकराचा राष्ट्रभिमान जागविणारा असा आहे. याचे उत्तम आरेखन करण्यात आले आहे. नागपुरातून अन्य राज्याकडे जाणाऱ्या शहरांचे शहरांचे प्रतीकही येथील भिंतींवर दिसून येत आहेत. या शहरात असा भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला ते अभिमानास्पद आहे. हा राष्ट्रध्वज बघून देशाभिमाने उर भरून येतो, असेही त्यांनी सांगितले. लोकमत वृत्तपत्र समूहाने हा राष्ट्रध्वज उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी कौतुक केले.





डॉ. विजय दर्डा यांनी स्वागत पर भाषण केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील कोनशिलेचे अनावरण झाले. त्यांनी राष्ट्रध्वजवंदन व राष्ट्रध्वजाचे अनावरण केले.


२००९ मध्ये कस्तुरचंद पार्क येथे राष्ट्रध्वज उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. २०१६ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या राष्ट्रध्वजाचे वास्तूविशारद शांतनू भाल्ला आहेत.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम