कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचे १५ उमेदवार बिनविरोध विजयी


डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.


कडोंमपा अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने या निवडणुकीसाठी युती केल्याची घोषणा केली. भाजप ६५ जागांवर आणि शिवसेना ५७ जागांवर लढणार असे जाहीर करण्यात आले. दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी नियमांचे पान करत उमेदवारी अर्ज भरले. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले. पण छाननी प्रक्रियेत काही अर्ज बाद झाले तर काही उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या १५ उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला.


प्रभाग क्रमांक १८ मधून रेखा चौधरी, प्रभाग क्रमांक २६ क मधून आसावरी नवरे आणि प्रभाग क्रमांक २६ ब मधून रंजना पेणकर यांच्या विरोधात दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले. तर उर्वरित बारा उमेदवारांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढली. बंड थंड झाले. यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अनेक उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावर भाजपला पाठिंबा देत माघारीची घोषणा केली. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे एकूण १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.



KDMC : बिनविरोध विजयी झालेले भाजपचे उमेदवार


१) रंजना पेणकर २६ ब


२) आसावरी नवरे २६ क


३) मंदा पाटील- २७ अ


४) ज्योती पाटील- २४ ब


५) रेखा चौधरी- १८ अ


६) मुकंद तथा विशू पेडणेकर- २६ अ


७) महेश पाटील २७ ड


८) साई शेलार १९ क


९) दिपेश म्हात्रे- २३ अ


१०) जयेश म्हात्रे- २३ ड


११) हर्षदा भोईर- २३ क


१२) डॉ.सुनिता पाटील- १९ ब


१३) पूजा म्हात्रे- १९ अ


१४) रविना माळी- ३० अ


१५) मंदार हळबे- २६ ड


Comments
Add Comment

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आमदार शरद सोनावणे आणि

'महायुतीचा हिंदू आणि मराठीच महापौर होईल'

मुंबई : भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या विधानाचा विपर्यास करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात नेरेटिव्ह

मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही; एकनाथ शिंदे कडाडले

उबाठा प्रमुखांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका निवडणुका आल्या की उद्धवना येते मुंबई आणि मराठी

'मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार'

राष्ट्रवादीची ताकद १६ जानेवारीला मुंबईत दिसेल मुंबई : झारखंडमध्ये एक जागा असताना मुख्यमंत्री होऊ शकतो तर ३०

राज्यातील दहा महापालिकांमध्ये भाजपचे ४७ नगरसेवक बिनविरोध

मुख्यमंत्र्यांचे 'ऑपरेशन मनधरणी' यशस्वी; महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या पोहोचली ६४वर मुंबई :

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या