नवी दिल्ली: शौक बडी महेंगी चीज हे! असे आता म्हणावे लागणार आहे. तंबाखू गुटखा, सिगारेट, व तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त कर लावण्याचे सरकारने यापूर्वीच ठरवले होते त्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारी २०२६ पासून होणार आहेत. कारण केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यातील ठरवलेल्या तर्कसंगतीकरण (GST Rationalisation) नुसार पाप वस्तू (Sin Goods) वरील कर ४०% स्लॅबमध्ये वर्गीकरण केला गेला होता. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या करात ही अतिरिक्त ४०% वाढ होणार असल्याने या वस्तू आता अव्वाच्या सव्वा दरात विकल्या जाणार आहेत. त्यामुळे नशेच्या अथवा चैनीच्या वस्तू आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणार आहेत.
जीएसटी दरकपातीचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतल्यानंतर सीन गूडसला ४०% पातळीवर टाकल्याचे घोषित केले होते दरम्यान तत्पूर्वी अर्थमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, जीएसटी सेस भरणी भरपाई (GST CessCompensation) पूर्ण झाल्यानंतर अंमलात आणला जाईल असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. अखेर फेब्रुवारी महिन्यात याची महत्वपूर्ण अंमलबजावणी होणार आहे. माहितीनुसार, पानमसाला तंबाखू गुटखा व तत्सम वस्तूवर ४०% अतिरिक्त कराची घोषणा केली असताना बिडीसाठी मात्र १८% जीएसटी सरकारने कायम ठेवला आहे.
हे दर महाग असताना अश्या उत्पादनांच्या वेळी जर्दा सेंटेंड तंबाख गुटखा तसेच गुटखा यांसारख्या वस्तू निर्माण करणाऱ्या मशिनरीवरही कॅपिटल डिटरमेशन अँड कलेक्शन ऑफ ड्युटी २०२६ या नव्या नियमाअंतर्गत अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. जीएसटी दरकपातीसह शासनाने तर्कसंगतीकरण घोषित केल्यानंतर या बीलाचाही समावेश करण्यात आला होता. राज्यसभा व लोकसभा दोन्ही सभागृहात या विधेयकाला मंजूरी देण्यात आली होती. त्यांचे कायद्यात रुपांतर झाल्याने आता नशेच्या वस्तू मोठ्या प्रमाणात महाग होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात लागू झालेल्या या निर्णयासह जीएसटी परतावा सेस तरतूद आपोआप रद्द होणार आहे.