Navnath Ban : संजय राऊत म्हणजे ‘पोपटलाल’, त्यांना मुंबईत ‘खान’ महापौर करायचा आहे; भाजप नेते नवनाथ बन यांचा टोला

“पत्राचाळीत मराठी माणसाला कुणी देशोधडीला लावलं?”


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांचा उल्लेख 'पोपटलाल' असा केला. "संजय राऊत हे स्वतः पोपटलाल आहेत. त्यांना मुंबईत 'खान' महापौर करायचा आहे का? त्यांनी आपला धर्म सोडला आहे, पण मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.



मराठी माणसाचा अपमान कुणी केला?


मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला घेरताना नवनाथ बन म्हणाले, "मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी कुणी मारली याचे उत्तर द्या. पत्राचाळीत काय झाले? तिथल्या मराठी माणसाला परागंदा कुणी केले? उलट देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांनी मराठी माणसाला आहे त्या ठिकाणी घरं देण्याचं काम केलं आहे. तुम्ही पत्राचाळीसाठी जेलमध्ये गेलात, हे विसरू नका." ज्या काँग्रेसने मराठी माणसावर गोळ्या घातल्या, त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात, त्याबद्दल आधी माफी मागा, असेही ते म्हणाले.



‘वापरा आणि फेकून द्या’ हीच तुमची नीती


उबाठा गटातील निष्ठावंतांच्या परिस्थितीवर भाष्य करताना बन यांनी गंभीर आरोप केले. "मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानास्पद वागणूक कुणी दिली? डिरंगे भाऊ रडत होते, फायर ब्रँड आजींचे म्हणणेही तुम्ही ऐकून घेतले नाही. वापरा आणि फेकून द्या हीच तुमची नीती आहे. संजय राऊत यांची निष्ठा आता उद्धव ठाकरेंकडे नसून राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडे आहे, कारण त्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे आता त्यांना खासदारकी देऊ शकत नाहीत," असा टोला त्यांनी लगावला.



वचननामा नाही, तर ‘नाटकनामा’!


उबाठा गटाने जाहीर केलेल्या वचननाम्यावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, "हा वचननामा नसून 'नाटकनामा' आहे. तुमची पार्टी ड्रामेबाज आहे. तुम्ही फक्त फुकटची आश्वासने दिली, पण 'देवाभाऊ' जे वचन देतात ते पूर्ण करून दाखवतात." तसेच, उबाठा गट एबी फॉर्मसोबत १५ कोटी रुपये देत असल्याचा खळबळजनक दावा करत निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.



स्टार प्रचारकांवरून टोला


"छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला विरोध करणारे राशिद बाबू, औरंगजेब फॅन क्लब आणि इक्बाल मुल्ला हे तुमचे स्टार प्रचारक आहेत, तर आमचे स्टार प्रचारक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत," असे म्हणत त्यांनी निवडणुकीतील वैचारिक फरक स्पष्ट केला. पूजा मोरे यांचे हृदयपरिवर्तन झाले असून त्या मोदींच्या विचारांशी जोडल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

BHMS Doctors : बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी बंद, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत स्थगिती; वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

ED Raid : ₹10 हजार कोटींच्या कथित पॉन्झी घोटाळ्याने खळबळ; ED ची मोठी कारवाई! मुंबई-भोपाळमध्ये छापे, ₹30 कोटींची मालमत्ता गोठवली

Mumbai : मुंबई आणि भोपाळमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या मोठ्या कारवाईमुळे कथित 10 हजार कोटी रुपयांच्या सागा

Chandrakant Patil : विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ; संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण