Thursday, March 26, 2026

दीपिका करणार कमबॅक! २०२६ मध्ये बिग बजेट चित्रपटांमधून झळण्याची शक्यता

दीपिका करणार कमबॅक! २०२६ मध्ये बिग बजेट चित्रपटांमधून झळण्याची शक्यता

मुंबई: बॉलीवूडची ग्लॅम अभिनेत्री दीपिका पादुकोण २०२५ मध्ये अनेक वादांमध्ये अडकली. तिच्या आठ तास काम करण्याच्या अटींवरून ती २०२५ मध्ये बॉलीवूड अभिनेत्रींबाबतच्या चर्चेत ती केंद्रस्थानी आली. मात्र मागील वर्षातील गोष्टी मागेच सोडून २०२६ मध्ये दीपिका पुन्हा चाहत्यांसाठी तयार झाली आहे. कारण, २०२६ मध्ये दीपिका अनेक लोकप्रिय अभिनेत्यांच्या बिग बजेट चित्रपटांमधून झळकणार आहे.

लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोणने काही काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. पण, आता २०२६ मध्ये ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. दीपिका सध्या तिच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग करत आहे. येत्या काळात दीपिका पादुकोण शाहरुख खानच्या 'किंग', विकी कौशलचा 'महावतार' आणि इतर काही बिग बजेट चित्रपटांमधून झळकणार असल्याची चर्चा आहे.

विकी कौशल मुख्य भूमिका असलेल्या 'महावतार' या पौराणिक चित्रपटात दीपिका पादुकोण महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकण्याची शक्यता आहे. चित्रपटातील दीपिकाच्या भूमिकेसाठी तिच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीये. पण, तिचे नाव या चित्रपटासाठी फायनल झाले असल्याची समाज माध्यमावर चर्चा आहे. तर दुसरीकडे 'ओम शांती ओम', 'चेन्नई एक्सप्रेस', 'जवान' आणि 'पठाण' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर दीपिका पादुकोण पुन्हा एकदा किंग खान सोबत बॉलीवूडमध्ये झळकणार आहे.

'टायगर वर्सेस पठाण' म्हणजेच सलमान विरूद्ध शाहरूख असा एक चित्रपट २०२६ मध्ये येणार आहे. हा चित्रपट बॉलीवूडमधील मोठ्या चित्रपटांपैकी एक असून यामधून सलमान खान व शाहरुख खान अनेक वर्षांनंतर एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटासाठी सुद्धा दीपिकाच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर आयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र भाग २ या चित्रपटात दीपिका पादुकोण महत्त्वपूर्ण भूमिकेतून दिसण्याची शक्यता आहे. तसेच 'पठाण'नंतर शाहरुख खानचा 'पठाण २' हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. यामधून पुन्हा एकदा दीपिका पादुकोण शाहरुख खानसह झळकणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात दीपिका पादुकोण महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकलेली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा