कडोंमपा निवडणुकीत जागावाटपाचे गुपित उघड होईना

जागावाटपाची अधिकृत घोषणा नाही


कल्याण : उद्या (ता.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काहींना महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून एबी फार्म देण्यात आले आहेत; परंतु जागावाटपाची अधिकृत घोषणा करायला आजही मुहूर्त मिळालेला नाही यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. जागावाटपाचे गुपित उघड होत नसल्याने युतीमधील ताण तणाव वाढत चालला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबई महापालिकेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेची ओळख आहे. दरम्यान काळात निवडणुकीची तारीख जाहीर होताच सभांना सुरुवात झाली. मेळावे आणि सभांमध्ये घोषणाबाजी आणि भाषणाना उधाण आले होते. नगरसेवक पदांसाठी इच्छुक असलेले हौशे-नौशे जागावाटपच्या अधिकृत घोषणेकडे डोळे लाऊन बसले आहेत. मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अजुनही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही.


तर कल्याण पूर्वेत भाजपने ९ जागांसाठी आणि शिवसेना (शिंदे गट) १६ उमेदवारी जाहीर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर काही इच्छुकांना उमेदवारी अर्ज न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. असे असले तरी अजून कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीचे चित्र अस्पष्टच आहे. महायुतीने जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने एक समिती स्थापन केली होती. मात्र भाजप कडून ८३ जागांची मागणी करण्यात आली. भाजपच्या वाट्याला ५८ तर शिवसेना (शिंदे गट) ६४ जागांवर लढेल, असे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारीची अधिकृत घोषणा होत नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.

Comments
Add Comment

मुंबई महानगरपालिकेसाठी मनसेची यादी जाहीर

मुंबई: महानगर पालिका निवडणूक२०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून

खुशाल शिट्ट्या फुंका; हिशोब मात्र ठेवा!

गणेश पाटील विरार : महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीसाठी केलेला खर्च निवडणूक आयोगाकडे सादर

वसई-विरारमध्ये आघाडीचा निर्णय गुलदस्त्यातच!

तिन्ही राजकीय पक्षांचे धोरण आज स्पष्ट होणार विरार : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा

पालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि

नवी मुंबईत उबाठा नेत्यांची भाजपमध्ये उडी

भाजप-शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन नवी मुंबई : नवी मुंबईत युतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसताना उबाठा गटातील

ठाण्यानंतर मीरा-भाईंदरमध्येही शिवसेनेला घराणेशाहीचा फटका

हक्काच्या प्रभागांमध्ये पती-पत्नीकडून तिकिटांची मागणी भाईंदर : ठाण्यानंतर आता मीरा-भाईंदरमध्येही शिवसेनेला