नववर्षाच्या रात्री ‘लेट नाईट’ बेस्ट बससेवा

गेटवे ते गोराईपर्यंत बेस्टची स्पेशल राइड


मुंबई : नववर्ष स्वागतासाठी बुधवारी (दि. ३१) रोजी रात्री मोठ्या प्रमाणावर नागरिक समुद्रकिनाऱ्यांकडे नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई खाडी, मार्वे चौपाटी आदी ठिकाणी जाण्यासाठी रात्री १० वाजल्यापासून १२.३० वाजेपर्यंत विविध बसमार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.
याअंतर्गत बसमार्ग क्र. ए-२१, सी-८६, ए-११२, ए-११६, २०३, २३१, ए-२४७, ए-२७२ आणि ए-२९४ या मार्गांवर अतिरिक्त बसगाड्या धावणार आहेत. तसेच ‘हेरिटेज टूर’ हा विशेष बसमार्ग बुधवारी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून गुरुवारी नववर्षाच्या पहाटेपर्यंत प्रवासी प्रतिसादानुसार चालविण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी प्रवाशांनी बेस्ट उपक्रमातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या अतिरिक्त बसफेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अतिरिक्त बसफेऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :

  •  बस मार्ग ए-२१ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते देवनार आगार) – ३ बस

  • सी-८६ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते वांद्रे आगार) – ३ बस,

  • ए-११२ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते चर्चगेट स्थानक) – ३ बस

  • ए-११६ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) – ५ दुमजली बस

  •  २०३ (अंधेरी स्थानक (पश्चिम) ते जुहू चौपाटी) – २ बस

  • २३१ (सांताक्रूझ स्थानक (पश्चिम) ते जुहू बस स्थानक) – ४ बस

  • ए-२४७ व ए-२९४ (बोरिवली बस स्थानक (पश्चिम) ते गोराई बीच) – २ बस

  • ए-२७२ (मालाड स्थानक (पश्चिम) ते मार्वे चौपाटी) – २ बस.

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र