हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला गुंड शहरातच लपून वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या गुंडाने शहरात एका महिलेवर बलात्कार केल्याचेही उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकारामुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. तर संबंधित गुंडावर निगराणी ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अंमलदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.



भोसरी येथे बेकायदेशीरपणे राहणारा २५ वर्षीय फारूख सत्तार शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला ८ एप्रिल २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी फाटा येथे वास्तव्य करत होता. इतकेच नव्हे तर १८ डिसेंबर रोजी त्याने एका ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेने आळंदी पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला.



पिंपरी-चिंचवड पोलिसांतर्फे हद्दपार गुंडांवर लक्ष ठेवण्यासाठी 'हद्दपार आरोपी दत्तक योजना' राबवली जाते. या योजनेअंतर्गत फारूख शेखवर नजर ठेवण्याची जबाबदारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे अंमलदार भागवत शेप यांच्याकडे होती. हद्दपार गुंड शहरात कधी आला आणि तो कोठे राहत होता, याची माहिती अद्ययावत ठेवण्यात शेप यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.



या घटनेने पोलीस आयुक्तालय हद्दीतील हद्दपार गुंडांच्या निगराणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या काळात पोलिसांनी ३०७ गुंडांना हद्दपार केले असले तरी, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ४५९ गुंडांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. यावरून मोठ्या संख्येने हद्दपार गुंड शहरात छुप्या पद्धतीने वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,