आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक शुक्रवारी १३ मार्च २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला यांची बिनविरोध निवड झाली.


सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष आणि उप अध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे हरिष भांदिर्गे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उप अध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाचे रितेश राय यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


बाजार व उद्यान समिती अध्यक्ष पदासाठी भाजपच्या हेतल गाला यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे भास्कर शेट्टी यांकाही एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समितीचे सदस्य उपस्थित होते.


सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष, उप अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अनुक्रमे महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. यावेळी सह आयुक्त (सुधार) संजोग कबरे, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सहायक आयुक्त (बाजार) अलका ससाणे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या (के.ई. एम) अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रू. न. कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता (प्रभारी) डॉ. देव शेट्टी, नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माला दीक्षित, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा