भारतीय वेब सिरीज वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहेत. चित्रपट, नाटकांप्रमाणेच वेब सिरीज आता भारतीयांच्या मनोरंजनाचा एक प्रमुख भाग बनली आहे. उत्तम कथाकथन, मजबूत पात्रे आणि उच्च दर्जाच्या निर्मितीसह, भारतीय निर्माते मोठ्या संख्येने प्रेक्षक आकर्षित करत आहेत. याच वेबसिरीज म्हटलं की, मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी, नवाझुद्दीन सिद्दीकी हे चेहरे समोर येतात. मात्र २०२५ मध्ये या नावांमध्ये अजून एका नावाचा समावेश झाला. ते म्हणजे, जयदीप अहलावत!
जयदीप अहलावत हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांपैकी एक आहे. या वर्षी त्याने 'पाताल लोक २' आणि 'फॅमिली मॅन ३' या दोन अतिशय वेगळ्या वेबसिरीजमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. 'पाताल लोक २' मध्ये त्याने हाथी राम चौधरी ही एका मध्यमवयीन पोलिस निरीक्षकाची भूमिका साकारली आहे. ज्यात वैयक्तिक समस्यांशी झुंजत असताना एका हाय-प्रोफाइल हत्येची चौकशी करण्यासाठी अहलावतला राजकीय कट आणि मिथकांच्या गुंतागुंतीच्या प्रकरणात ओढले जाते. या भुमिकेसाठी लागणारा साजेसा हावभाव, आवाज अशा एकंदर सर्वच बाजूंनी अहलावत उठून दिसतो आहे.
अमेरिका: गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून दोन्ही देशातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या युद्धाचा परिणाम फक्त दोन ...
त्याची दुसरी वेबसिरीज म्हणजे, फॅमिली मॅन ३! या वेब सिरीजमध्ये मनोज बाजपेयी, समंथा प्रभु असे आव्हानात्मक चेहरे असताना पण जयदीप प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेण्यात यशस्वी झाला आहे. यामध्ये त्याने खलनायक रुक्माची भूमिका साकारत आहे. जी पाताल लोक २ मधील भूमिकेच्या विरूद्ध आहे. मात्र या दोन्ही वेब सिरीजमधून त्याने अभिनय क्षेत्रात जी भरारी घेतली आहे, ती उत्कृष्ट आहे. तर २०२६ मध्ये जयदिप दृश्यम ३ मध्ये दिसण्याची शक्यता आहे.