हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार


नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राबवण्यात येणारा हेटवणे पाणीपुरवठा वाढीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २९ डिसेंबर रोजी महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) पहिल्यांदाच टनेल ब्रेकथ्रू साध्य करणार असून, वॉटर टनेल पॅकेज-१ अंतर्गत वहाळ गावातील शाफ्ट-४ येथे हा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होणार आहे.


नवी मुंबई तसेच सिडको विकसित परिसरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात १३.२५ किमी लांबीचा कच्च्या पाण्याचा टनेल आणि १५.४ किमी लांबीचा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा टनेल उभारण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिडकोची सध्याची १२० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणीपुरवठा क्षमता वाढून तब्बल २७० एमएलडी होणार आहे.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिडकोकडून प्रथमच टनेल प्रकल्प राबवण्यात येत आहे. या पहिल्या टनेल ब्रेकथ्रूमुळे उर्वरित कामाला गती मिळणार असून, भविष्यात नवी मुंबईसाठी दीर्घकालीन पाणी सुरक्षेच्यादृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पॅकेज-१ अंतर्गत ८.७ किमी लांबीचा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा टनेल उभारण्यात येत असून, त्यापैकी आतापर्यंत ५.५२ किमी खोदकाम पूर्ण झाले आहे. हा टनेल जमिनीखाली सुमारे १०० मीटर खोलीवरून जात आहे. डेक्कन सह्याद्री भागातील कठीण खडक, कामाच्या ठिकाणी मर्यादित जागा आणि साहित्य बाहेर काढण्यातील आव्हाने यामुळे प्रकल्पात अडचणी आल्या. सिडकोचे अभियंते आणि ठेकेदार कंपनीच्या पथकातील सातत समन्वयामुळे काम यशस्वीपणे पुढे सरकले. टनेल ब्रेकथ्रू नवी मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवे बळ देणारा ठरणार. शहराच्या विकासाला आवश्यक असलेली पाण्याची गरज भागवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Comments
Add Comment

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या

वर्षा उसगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर; दिसणार 'या' लोकप्रिय मालिकेत

मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता स्टार प्रवाहवरच्या मालिकेत दिसणार आहेत. वर्षा

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

शिक्षकांकडून अमानुष वागणूक; लहानग्याच्या छळाप्रकरणी पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षकांकडून अमानुष वागणूक

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

खोटा बनाव रचत, मुलीच्या आजाराला कंटाळून जन्मदात्या आईनेच घेतला ६ वर्षांच्या मुलीचा जीव

पनवेल : आई आणि तीच मूल मग मुलगा असो वा मुलगी यांच्या नात्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलना करता येत नाही. आपलं