उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तुळापूर येथील समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले आणि समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, वढू बुद्रुकचे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापुरच्या प्रशासक संरपच ॲड. गुंफा इंगळे आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत सहभागी झाल्या. तुळापूर येथील संगमस्थळी जाऊन त्यांनी संगमेश्वराचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी  तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.




Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी