बादशाहनंतर आता 'या' प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध गायकला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला परत एकदा अशी धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ कॉल व्हायरल होत आहे. त्यामध्ये स्वतःला गँगस्टर गोल्डी बराड असल्याचं सांगणारा व्यक्ती गिप्पी ग्रेवालला थेट धमकी देत आहे. या घटनेनंतर चाहते आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.


सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये मोहालीचा उल्लेख करत पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप या व्हायरल ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी पंजाब पोलिसांनी केलेली नाही. तसेच या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नाही.


याआधीही गायक गिप्पी ग्रेवालला अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या असून तो सध्या कॅनडातील व्हॅन्कुव्हर शहरामध्ये असलेल्या व्हाईट रॉक या ठिकाणी राहतो. गायक गिप्पी ग्रेवालच्या घरावर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही गोळीबार झाला.


तसेच, या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर पुन्हा एकदा गिप्पी ग्रेवालच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर