महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’


नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरमधील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशातील वीस बालकांना २०२५ या वर्षासाठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.


शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या बालकांना गौरविण्यात आले. यापैकी दोघांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये नऊ मुलगे आणि अकरा मुलींचा समावेश आहे.


महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय अर्णव महर्षी यास विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. पक्षाघाता तडाखा बसलेल्या रुग्णांच्या हातांसाठी AI-आधारित पुनर्वास उपकरण आणि अॅक्टिव्ह हँड रिस्ट बँड तयार करणाऱ्या अर्णव महर्षी याने स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या मदतीने हे नवोन्मेषी उपकरण विकसित केले आहे.


‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. 'ही बालके भारताच्या अमृत पिढीचे खरे प्रतिनिधी आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि इतर आव्हानांवर मात करून शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नवाचार, विज्ञान, समाजसेवा व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. हा पुरस्कार युवा पिढीतील शौर्य, धैर्य आणि संवेदनशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल', असे राष्ट्रपतींनी सांगितले. मुलांच्या संकल्प आणि प्रयत्नांमुळे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असा विश्वास राष्ट्रपती यांनी यावेळी व्यक्त केला.



पुरस्कार विजेत्यांची नावे



  1. व्योमा प्रिया शौर्य तामीळनाडू (मरणोत्तर)

  2. कमलेश कुमार शौर्य बिहार (मरणोत्तर)

  3. मोहम्मद सिडान पी शौर्य केरळ

  4. अजय राज शौर्य उत्तर प्रदेश

  5. एस्थर लालदुहोमि कला संस्कृती मिझोरम

  6. सुमन सरकार कला संस्कृती पश्चिम बंगाल

  7. पूजा पर्यावरण उत्तर प्रदेश

  8. शवन सिंह सामाजिक सेवा पंजाब

  9. वंश तायल सामाजिक सेवा चंदीगड

  10. आइशी प्रिशा विज्ञान तंत्रज्ञान आसाम

  11. अर्णव महर्षी विज्ञान तंत्रज्ञान महाराष्ट्र

  12. शिवानी उपारा क्रीडा आंध्र प्रदेश

  13. वैभव सूर्यवंशी क्रीडा बिहार

  14. योगिता मंडावी क्रीडा छत्तीसगड

  15. लक्ष्मी प्रगयिका क्रीडा गुजरात

  16. ज्योति क्रीडा हरियाणा

  17. अनुष्का कुमारी क्रीडा झारखंड

  18. धिनिधि देसिंगु क्रीडा कर्नाटक

  19. ज्योषणा सबर क्रीडा ओडिशा

  20. विश्वनाथ कार्तिके क्रीडा तेलंगणा


Comments
Add Comment

ॲमेझॉनच्या भारतातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी

एच १-बी व्हिसाच्या कठोर नियमांमुळे कामात बदल नवी दिल्ली : ॲमेझॉनने व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भारतात

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या

Bullet Train : "बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला! १५ ऑगस्ट... पहिली गाडी 'या' मार्गावर धावणार; मुंबईत कधी?

मुंबई : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत अनपेक्षित खीळ

Cigarette Price Increase in India : चहा-सुट्टाचा प्लॅन आता 'महागात' पडणार! एका सिगरेटसाठी तब्बल ७२ रुपये? काय आहे सरकारचा नवा नियम

७ वर्षांनंतर उत्पादन शुल्कात मोठी वाढ नवी दिल्ली : देशातील तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत १ फेब्रुवारी २०२६

Explosion In Himachal Pradesh : हिमाचलमध्ये नववर्षाची सुरुवात हादरवणारी! नालागढमध्ये शक्तिशाली स्फोट, आर्मी हॉस्पिटलच्या काचांचा पडला खच

सोलन : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालागढ