Israel - Iran War : अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर काश्मीरमधील लाल चौकात निदर्शने

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिया समुदायातील लोकांनी अमेरिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. खामेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले असून त्यांनी कडक विरोध दर्शविला आहे. या वेळी आंदोलकांकडून अमेरिकेविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येत आहे.


हजारो लोकांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूविरोधात रोष व्यक्त केला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमधील लाल चौक येथे मोठी गर्दी जमली आहे. लाल चौक परिसरात पुरुष आणि युवक अली खामेनेई यांचे छायाचित्र हातात घेऊन दिसत आहेत. या वेळी आंदोलकांनी “रहबर तुझ्या रक्तातून क्रांती येईल”, “अमेरिका-इस्रायल मुर्दाबाद” अशा घोषणा देत आहेत. तसेच “जो अमेरिका समर्थक आहे, तो गद्दार आहे” असेही स्पष्टपणे सांगितले जात आहे. काश्मीरच्या विविध भागांत या घटनेबाबत संतापाची लाट उसळली असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. मोठ्या संख्येने लोक घरे सोडून रस्त्यावर तसेच इमामबाड्यांमध्ये जमून आंदोलन करत आहेत.


अधिकाऱ्यांनी सांगितले की शिया बहुल भागांत शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी शांततेत मोर्चा काढत अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणा दिल्या. अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. दरम्यान इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी (१ मार्च) सकाळी पुष्टी केली की इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे.


शनिवारी (१ मार्च) इस्रायलने अमेरिकेसोबत मिळून इराणची राजधानी तेहरानवर प्रारंभीचा हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणने सुमारे आठ देशांमध्ये प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या कुटुंबावरही हल्ला झाल्याची माहिती समोर येत असून त्यात खामेनेई यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment

Gas Supply Changes : स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल

नवी दिल्ली : स्ट्रेट ऑफ होर्मुझ भागातील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने

Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा

Narendra Modi : आसाममधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची खासदारांसोबत आढावा बैठक

नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, मालदेवतामध्ये २३३ मिमी पावसाची शक्यता देहरादून : उत्तराखंडमध्ये सक्रिय

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Suneel Anand Passed Away : अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन; ज्या रुग्णालयात वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, तिथेच लेकाचाही मृत्यू

लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला