मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा वाटपाचा तिढा सोडवण्याच्या ...
उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे दोन्ही पक्ष युतीमध्ये निवडणूक लढवतील. याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होईल अशाप्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. परंतु उबाठा सैनिक या युतीसाठी आग्रही असल्या तरी मनसैनिकांच्या मनाला ही युती पटलेली नाही. काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही भावांचे१८ वर्षांनंतर मनोमिलन झाले होते, त्याच कार्यक्रमात जर दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा झाली असती तर आजपर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे एकदिलाने काम करू शकले असते. परंतु दोन भावांच्या मनोमिलनानंतर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुप्त संदेश देत पदाधिकारी आणि नेत्यांना उबाठाच्या शाखांसह कार्यक्रमांमध्ये न जाण्याचे कळवले होते. त्यामुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड संभ्रम पसरला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या अंगात शंभर हत्तीचे बळ ...
काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार तर युतीची घोषणा आधी झाली असती, एव्हाना दोन्ही पक्षांचे कार्यक्रम संयुक्तपणे होवू शकले असते. परंतु आता निवडणुकीच्या मतदानाला २० दिवस असताना दोन्ही पक्षांची युती झाल्याने कार्यकर्त्यांची मने जुळायला हा अवधी कमी आहे. त्यामुळे युतीची घोषणा लांबवल्यामुळे दोन्ही पक्षांचा प्रभावशील परिणाम म्हणावा तेवढा दिसून येणार नाही.
या युतीमुळे जे जुने शिवसैनिक आहेत ते आणि ज्यांचा गुजराती,मारवाडीसह इतरांवर राग आहेत, ते आनंद व्यक्त करताना दिसतील आणि ते मतदान करतील. मनसैनिक शिवसेेनेच्या उमेदवाराला मतदान करतील किंवा मन लावून काम करेल असे चित्र नसेल. त्यामुळे या युतीचा फायदा उबाठा शिवसेनेला होणार नसून याचा फायदा झाला तर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षालाच अधिक होईल,अशीही शक्यता तळागाळातून व्यक्त होताना दिसत आहे.