कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का


उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी माजी तीन नगरसेवक व सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या घडामोडीमुळे शहरातील उबाठासेना खिळखिळी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


उल्हासनगर शिवसेना म्हणजे बोडारे बंधू असे समीकरण अनेक वर्षे प्रस्थापित होते. शहरात कलानी विरुद्ध बोडारे असा राजकीय सामना नागरिकांनी पाहिला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उबाठा सेनेला मजबूत करण्याचे काम बोडारे बंधूंनी केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी चंद्रकांत बोडारे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, तर लहान बंधू धनंजय बोडारे यांची शहरप्रमुख पदावरून कल्याण जिल्हाप्रमुखपदी बढती झाली होती.


दरम्यान, पर्यावरणवादी सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणी धनंजय बोडारे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कोणताही राजकीय अडथळा नको म्हणून त्यांनी पत्नी व माजी नगरसेवक वसुधा बोडारे, माजी नगरसेविका शीतल बोडारे, ओमी टीमच्या माजी नगरसेविका आशा नाना बिऱ्हाडे यांच्यासह सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला.


सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले धनंजय बोडारे शहरात मोठा जनाधार असलेले नेते म्हणून ओळखले जातात. उपमहापौर, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवूनही अत्यल्प मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे.


बोडारे यांच्यासोबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष परमानंद गिरेजा, नाना बिऱ्हाडे, दिलीप महाराज, हंनी कल्याणी, राजकुमार लहराणी यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला. येत्या दोन दिवसांत उद्धवसेनेचे आणखी स्थानिक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत शहर-जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिले आहेत.


भाजपला मिळाला मराठी चेहरा


शहर भाजपकडे माजी नगरसेवक प्रशांत पाटील, अर्चना करणकाळे असे मराठी चेहरा होते. मात्र संपूर्ण शहरस्तरावर प्रभाव टाकणारा चेहरा म्हणून बोडारे यांच्याकडे बघितले जाते. बोडारे यांच्या प्रवेशाने मराठी परिसरात मराठी उमेदवारी निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे