आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. ही दुर्घटना अपार्टमेंटच्या १२ व्या, १३ व्या आणि १४ व्या मजल्यांवर घडली. ज्यात चित्रपट निर्माते संदीप सिंह यांचे घर अपार्टमेंटच्या १४ व्या मजल्यावर असल्याने त्यांनाही या आगीच्या दुर्घटनेचा फटका बसला. संदीप सिंघ नुकतेच हर्नियावर उपचार घेऊन कोकिलाबेन रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर घरी परतले होते. मात्र या आग अपघातात सिंघ यांना कोणतीच दुखापत झालेली नाही. तरी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन यांनी संदीप सिंघ यांना तातडीने आपल्या घरी नेले आणि त्यांना कोणता त्रास झाला नसल्याचे तपासले.



या घटनेत संदीप सिंघ सुरक्षित असल्याची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि चाहत्यांना सुटकेचा नि:श्वास सोडावा लागला. संदीप सिंघ यांची चित्रपटसृष्टीत दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द आहे. त्यांनी पत्रकारितेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर भन्साली प्रॉडक्शनमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी स्वतःची निर्मिती कंपनी, लेजेंड स्टुडिओजची स्थापना केली. त्यांनी निर्मिती केलेले चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत तर समीक्षकांनीही कौतुकास्पद कामगिरी केली.



संदीप सिंघ हे 'मेरी कोम', 'सरबजीत', 'अलिगढ', 'झुंड', 'स्वातंत्र वीर सावरकर', 'सफेद' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज'सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्या 'मेरी कोम' मधील प्रियांका चोप्राच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली, तर 'सरबजीत' आणि 'अलिगढ' सारख्या चित्रपटांनी सामाजिक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यांच्या 'झुंड' आणि 'स्वातंत्र वीर सावरकर'सारख्या चित्रपटांमध्येही इतिहासाबद्दलची संवेदनशीलता दिसून येते. याप्रमाणेच त्यांनी नथुराम गोडसेवर आधारित 'गोडसे' हा चित्रपटही दिग्दर्शित केला आहे.


दरम्यान दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील अभिनेता पुष्कर जोगच्या बिल्डींगला देखील आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. यावेळी पुष्कर आणि त्याची मुलगी घरात अडकले होते. त्यामुळे मदतीसाठी पुष्करने सोशल मीडिया पोस्ट केली आणि त्याच्यासाठी अनेक हात पुढे आले. यामुळे पुष्करला घराबाहेर पडण्यास आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळाली. या घटनेनंतर पुष्करने झालेल्या नुकसानाचा व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. मात्र आग का लागली याचे कोणतेच कारण अद्याप समोर आले नाही.


Comments
Add Comment

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर मनोरंजन विश्वातिल मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

अ‍ॅटलीने दीपिका पादुकोणला म्हटले ‘लकी चार्म’; AA22XA6 मध्ये दिसणार अगदी नवा अवतार

मुंबई : दिग्दर्शक अ‍ॅटली यांचा आगामी चित्रपट, ज्याला सध्या AA22XA6 असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे, अधिकृत

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचा प्रोमो समोर; रिलीज तारीख जाहीर...

मुंबई : चित्रपट सृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता शाहरुख खान. शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किंग'ची

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे

Konkan Hearted Girl : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने शेअर केली गुड न्यूज; घरी आली नवी ‘लक्ष्मी’...

बिग बॉस मराठी ६ मधील लोकप्रिय स्पर्धक आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द असणारी ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी