निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. वेगळे आशयविषय घेऊन आलेले मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असतात. आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली हलकीफुलकी गोष्ट असलेला अरविंद जगताप लिखीत आणि दिनेश जगताप दिग्दर्शित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल, तर आता ‘प्रसारभारती’च्या वेव्हज ओटीटी चॅनलवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट नुकतेच ‘प्रसारभारती’च्या वेव्हज (waves) ओटीटी चॅनलवर जगभरात प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, सुनील अभ्यंकर आदी कलाकारांच्या चित्रपटातील भूमिका लक्षवेधी आहेत. एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची, नवरा बायकोच्या प्रेमाची आणि त्यासोबत बापलेकाच्या नात्याची रंजक कथा लेखक अरविंद जगताप यांनी मिश्कीलपणे मांडली आहे. ही आणीबाणी कोणासाठी अडचणीची ठरणार ? आणि कोण यातून सहीसलामत बाहेर पडणार याची मनोरंजक कथा पाहायला मिळणार आहे.
Comments
Add Comment

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा

हास्यजत्रा फेम इशा डे हिचा नवरा आहे तरी कोण? वाचा सविस्तर

मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री इशा डे हिने

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

मुंबई : गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही