कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी


वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२ गावांचा विस्तीर्ण परिसर असलेल्या कुडूस येथील पोलीस दूरक्षेत्राचे रूपांतर आता स्वतंत्र पोलीस ठाण्यात होणार आहे. नागरिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या मागणीला यश आले असून, वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहत आणि गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारच्या गृहविभागाने या नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे.
कुडूस परिसर हा केवळ ग्रामीण भाग राहिला नसून, येथे कोकाकोला, ओनिडा, एस.एल. पॅकेजिंगसह चारशेहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत. उद्योगधंद्यांमुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. या परिसरातून गेलेल्या वाडा-भिवंडी-मनोर या राज्य महामार्गावर नेहमीच अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या असते. अपुऱ्या मनुष्यबळावर ताण: सुमारे एक लाखाहून अधिक लोकसंख्या आणि ५२ गावांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आजवर केवळ ७ पोलिसांवर होती. अपुऱ्या मनुष्यबळामुळे चोरीचे मोठे गुन्हे, कामगार संघटना व मालकांमधील वाद तसेच इतर तंटे हाताळताना पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या.


कायद्यासुव्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल


स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे या भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होणार आहे. नवीन रचनेनुसार, कुडूस पोलीस ठाण्यासाठी दोन पोलीस अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचारी इतके अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. गृहविभागाने घेतलेल्या या निर्णयाचे कुडूस आणि परिसरातील नागरिकांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. आता स्थानिक पातळीवरच नागरिकांचे प्रश्न आणि तक्रारी वेळेवर सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी

भाजपच्या रणनीतीपुढे विरोधकांचे पानिपत

विरोधी पक्षांची उडाली धूळधाण आघाडीत बिघाडी कायम वसंत भोईर वाडा : वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत स्वबळावर

जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी

जव्हार : जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर

वाड्यात कमळ फुलले; नगराध्यक्षपदी भाजपच्या रिमा गंधे

उबाठा गटाचा उडवला धुव्वा वाडा : वाडा नगरपंचायतीच्या रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने नगराध्यक्ष पदासह १२