मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच सकारात्मक आणि नकारात्मक चर्चांना पेव फुटले. आई झाल्यानंतर काम आणि वैयक्तिक आयुष्यात बाळाला वेळ देण्यासाठी तिने ही मागणी केली होती. दरम्यान ही मागणी काही प्रोजेक्ट्समध्ये मान्य न झाल्याने दीपिकाने चित्रपटांमधून माघारही घेतली. याविषयाबाबत आता नुकत्याच आई झालेल्या कियारा अडवाणीने एका मुलाखतीमध्ये आपले मत व्यक्त केले आहे.
कियारा अडवाणी आणि तिचा पती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी १५ जुलैला एका गोंडस बाळाला जन्म दिला. मातृत्वात पदार्पण केल्यानंतर कियाराने गीतू मोहन दास दिग्दर्शित 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रॉन-अप' या चित्रपटात काम केले. या चित्रपटात ती नादिया ही भूमिका साकारणार असून, या भुमिकेबद्दल २२ डिसेंबर रोजी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कियाराने लिहले होते की, "ही भूमिका माझ्याकडून शारीरिक, मानसिक व भावनिक पातळीवर खूप काही मागणारी होती. हा माझ्यासाठी पूर्णपणे बदल घडवणारा अनुभव असून आजपर्यंतची माझी सर्वांत कठीण भूमिका आहे."
नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ ...
कियाराच्या या स्टोरीवरून मातृत्वानंतरची तिची तारांबळ दिसून आली. दरम्यान एका मुलाखतीत कियाराने सध्या चर्चेत असलेल्या आठ तासांच्या कामाच्या वादावर आपले मत मांडले आहे. कियारा अडवाणीने आठ तासांच्या कामाच्या शिफ्टवर सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे, असे सांगितले. ती म्हणाली, "अतिरिक्त कामाचा ताण कोणत्याही क्षेत्रासाठी उपयोगाचा नसतो."
कियारा पुढे म्हणाली की, ती कामाच्या ठिकाणी आणि घरी, तिच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या मानते. ज्या आहेत सन्मान, समतोल व आदर. या तीन गोष्टींमुळे तिला मानसिक थकवा दूर करण्यासाठी मदत असल्याचे तिने सांगितले. तसेच तिने हसत सांगितले की, "माझी मुलगी सरायाहच्या हसण्या-खिदळण्याचा आवाजच माझ्यासाठी मानसिक थकवा दूर करण्यासाठी सर्वांत मोठा उपाय आहे."