परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या विद्यापीठाच्या एका सत्र परिक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नावरून विद्यापीठात गोंधळ निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम थेट प्राध्यापकाच्या नोकरीवर झाला असून अंतिम निकषापर्यंत प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील बीए (ऑनर्स) सोशल वर्क या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि याच प्रश्नावरून वाद सुरू झाला आहे. याची दखल विद्यापीठाने घेत मोठी कारवाई केली असून अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच समिती स्थापन करताच संबंधित पेपर तयार करणाऱ्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सत्र परीक्षेत भारतात मुस्लिम नागरिकांविषयी उल्लेख असलेला एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या प्रश्नाविरोधात विद्यापीठ प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याने विद्यापीठाने पोलिसांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास सांगितले.




विद्यापीठाने याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती या प्रकरणाची तपास पूर्ण करून निष्कर्ष देईपर्यंत प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कायद्याच्या कलम ३७(१) अंतर्गत ही कारवाई केली आहे.


नेमका काय प्रश्न विचारण्यात आला होता?
बीए (ऑनर्स) सोशल वर्क प्रोग्रामसाठी 'भारतातील सामाजिक समस्या' या विषयाची सत्र १ ची प्रश्नपत्रिका प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांनी तयार केली होती. ज्यात 'भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांवरील अत्याचारांवर योग्य उदाहरण देऊन चर्चा करा', असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावरून वाद निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी