नोरा फतेही आणि संजय दत्तसह ५ जणांना महिला आयोगाचे समन्स

- 'सरके चुनर तेरी सरके' गीतातील अश्लीलते संदर्भात कारवाई


मुंबई : 'सरके चुनर तेरी सरके' या अश्लील गाण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्तसह ५ जणांना समन्स बजावले आहे. आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.


राष्ट्रीय महिला आयोगाने अधिनियम १९९० अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करत “सरके चुनर तेरी सरके” या गाण्यात अश्लीलता आणि अभद्रता असल्याच्या आरोपांवर आधारित माध्यमांतील बातम्यांवरून स्वतःहून (सुमोटो) कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता संजय दत्त, रकीब आलम, केवीएन समूहाचे निर्माता वेंकट के. नारायण आणि दिग्दर्शक किरण कुमार यांना आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत.


आयोगाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, संबंधित गाणे लैंगिक उत्तेजक, आक्षेपार्ह असून भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पॉक्सो कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्याने घेतले जात असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. संबंधित सर्वांना २४ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता आवश्यक कागदपत्रांसह आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


अनुपस्थित राहिल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय महिला आयोगाने दिला आहे.

Comments
Add Comment

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता