बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ


मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेटपटूंसाठी ऐतिहासिक निर्णय घेताना देशांतर्गत महिला खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. २२ डिसेंबर रोजी झालेल्या बीसीसीआयच्या अॅपेक्स कॉउन्सिलच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन संरचना तयार करणे आणि देशांतर्गत पातळीवर त्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळवून देणे हा या या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना समान सामना फी दिली जाईल. बीसीसीआयने सांगितले की, आधी वरिष्ठ महिला खेळाडूंना एका घरगुती हंगामात लीग स्टेज खेळल्यास २ लाख रुपये मिळत होते. तर आता फक्त ४ एकदिवसीय सामने खेळल्यास खेळाडू २ लाख रुपये कमावतील. आता एका हंगामात खेळल्यास खेळाडूंना ५ ते ७ लाख रुपये मिळतील. सामन्यांची संख्या वाढल्यास खेळाडूंची कमाई वाढेल.


पूर्वीची वेतन रचना :


जुन्या वेतन रचनेनुसार, वरिष्ठ महिला स्पर्धांमध्ये प्लेइंग-११ मधील खेळाडूंना दिवसाला २०,००० रुपये, तर राखीव खेळाडूंना १०,००० रुपये मिळत होते. ज्युनियर संघातील खेळाडूंना १०,००० रुपये आणि ५,००० रुपये दिले् जात होते. टी–२० स्पर्धांमध्ये हे मानधन आणखी कमी होते. त्यामुळे एखादी वरिष्ठ महिला क्रिकेटपटू संपूर्ण हंगामात फक्त लीगमधील सामने खेळली तरी तिला जास्तीत जास्त २ लाख रुपयेच मिळत होते; परंतु बीसीसीआयच्या या नवीन निर्णयामुळे महिला क्रिकेटपटूंना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.


महिला क्रिकेटपटूंचे मानधन दुप्पट


बीसीसीआयने जाहीर केलेल्या नवीन वेतन रचनेनुसार महिला क्रिकेटपटूंच्या सामन्यांच्या मानधनात लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ सध्याच्या तुलनेत २.५ पट असल्याचे सांगितले जात आहे.


बीसीसीआयचे मोठे पाऊल :


बीसीसीआयचा असा विश्वास आहे की, या सुधारित वेतन रचनेमुळे महिला क्रिकेटपटू आणि देशांतर्गत सामना अधिकाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा आणि प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे देशातील देशांतर्गत क्रिकेट रचना आणखी मजबूत होईल.


वरिष्ठ महिला एकदिवसीय आणि बहुदिवसीय स्पर्धा




  •  प्लेइंग इलेव्हन : ५०,००० रुपये प्रतिदिन

  • राखीव खेळाडू : २५,००० रुपये प्रतिदिन


राष्ट्रीय महिला टी-२० स्पर्धा




  •  प्लेइंग इलेव्हन : २५,००० रुपये प्रतिदिन

  •  राखीव खेळाडू : १२,५०० रुपये प्रतिदिन


ज्युनियर महिला स्पर्धा




  • प्लेइंग इलेव्हनः २५,००० रुपये प्रतिदिन

  • राखीव खेळाडूः १२,५०० रुपये प्रतिदिन


पंच आणि सामनाधिकाऱ्यांचीही चांदी


महिला वरिष्ठ खेळाडू आणि ज्युनियर खेळाडू यांच्यासह पंच आणि सामना अधिकाऱ्यांच्या मानधनातही दुपटीने वाढ करण्यात आली आहे. आता, देशांतर्गत लीग सामन्यासाठी पंचांना प्रतिदिन ४०,००० रुपये मिळणार आहेत. तसेच, नॉकआउट सामन्यांसाठी ही रक्कम वाढवून ५०,०००ते ६०,००० रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. यामुळे रणजी ट्रॉफीच्या लीग सामन्यांमध्ये पंचाना प्रति सामना सुमारे १.६० लाख रुपये मिळतील, तर नॉकआउट सामन्यांमध्ये त्यांना २.५ ते ३ लाख रुपये मिळतील.


Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील