एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर


गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी यापूर्वी पाच पुरुषांना मिळाली असून, महिला नेत्याला मात्र केवळ एकदाच महापौर पदाच्या खुर्चीवर बसता आले आहे. महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना महापौर पदाच्या आरक्षणाबाबत मात्र अनिश्चितता आहे. त्यामुळे आगामी महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत.


२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांनीच केली आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निवडणुकांच्या पूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे संभाव्य नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतील नावे मतदारांसमोर सुद्धा आली होती. तथापि, महापालिका निवडणुक प्रक्रिया सुरू करण्याअगोदर महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे १६ जानेवारी रोजी नगरसेवक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना महापौर पदाच्या आरक्षणाबाबत उत्सुकता राहणार आहे.वसई-विरार महापालिका अस्तित्वात आल्यापासून ६ नगरसेवकांना महापौर पदाची संधी मिळाली आहे. प्रथम महापौर होण्याचा मान २८ मार्च २०१० रोजी बहुजन विकास आघाडीच्या राजीव यशवंत पाटील यांना मिळाला. त्यानंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नारायण मानकर हे महापौर झाले. महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर या वसई-विरारच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. त्यानंतर रुपेश जाधव, प्रकाश रॉड्रिग्ज आणि प्रवीण शेट्टी या तीन पुरुष नगरसेवकांना महापौर पदाची संधी मिळाली. ११५ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत आता सातवा महापौर कोण आणि कोणत्या राजकीय पक्षाचा असेल ही बाब आता आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.


वसई-विरारमधील आतापर्यंतचे महापौर


१) राजीव यशवंत पाटील (२८ मार्च २०१० ते ४ जानेवारी २०१२), २) नारायण मानकर ( ५ जानेवारी २०१२ ते २८ जून २०१५), ३) प्रविणा हितेंद्र ठाकूर (२९ जून २०१५ ते २८ डिसेंबर २०१७), ४) रुपेश जाधव ( २९ डिसेंबर २०१७ ते २५ जुलै २०१९), ५) प्रकाश रॉड्रिग्ज ( २६ जुलै २०१९ ते २२ ऑगस्ट २०१९ ), ६) प्रवीण शेट्टी (२३ ऑगस्ट २०१९ ते २८ जून २०२०).

Comments
Add Comment

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

भाजपच्या रणनीतीपुढे विरोधकांचे पानिपत

विरोधी पक्षांची उडाली धूळधाण आघाडीत बिघाडी कायम वसंत भोईर वाडा : वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत स्वबळावर

जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी

जव्हार : जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर

वाड्यात कमळ फुलले; नगराध्यक्षपदी भाजपच्या रिमा गंधे

उबाठा गटाचा उडवला धुव्वा वाडा : वाडा नगरपंचायतीच्या रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने नगराध्यक्ष पदासह १२

खासदारांची ‘फिल्डिंग’ होम ग्राउंडवर यशस्वी!

वाडा पालिकेत स्पष्ट बहुमतासह नगराध्यक्षही भाजपचा गणेश पाटील पालघर : जिल्ह्यात निवडणूक झालेल्या तीन नगर

पालघरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेला कौल

तीन ठिकाणी नगराध्यक्षाच्या पक्षालाच बहुमत पालघर : पालघर जिल्ह्यात पार पडलेल्या तीन नगर परिषद आणि एका