२०२५ मध्ये जनरेशन झेडने आणला पर्यटनाचा नवा ट्रेंड

प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल


नवी दिल्ली : २०२५ मध्ये भारतीयांच्या प्रवासाच्या सवयी बदलल्या असून प्रवास, मुक्काम आणि नियोजनाच्या सवयींमध्ये मोठे परिवर्तन झाल्याचे चित्र समोर आले. फ्लिपकार्टच्या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म क्लिअरट्रिपने जाहीर केलेल्या ‘क्लीअरट्रिप अनपॅक २०२५' ('Cleartrip Unpack 2025’) अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. या वर्षात जनरेशन झेड पर्यटकांमध्ये मोठी वाढ झाल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले. २०२५ मध्ये जेन झी प्रवाशांची संख्या तब्बल ६५० टक्क्यांनी वाढली. या तरुण प्रवाशांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास केला. दुबई, क्वालालंपूर आणि बँकॉक ही ठिकाणे जेन झी ची सर्वाधिक पसंतीची ठिकाणे ठरली. बजेट-फ्रेंडली पर्यायांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.


यूपीआय पेमेंट्समध्ये ६ टक्के, तर क्रेडिट कार्ड व्यवहारांमध्ये ८ टक्के वाढ झाली. विशेष म्हणजे, ६६ टक्क्यांहून अधिक बुकिंग्स स्मार्टफोनद्वारे करण्यात आल्या. क्लिअरट्रिपच्या मोबाइल अॅपवरूनच बहुसंख्य प्रवाशांनी फ्लाइट्स आणि हॉटेल्स बुक केली. यंदा उत्तर प्रदेशात सर्वाधिक पर्यटक आले होते. याशिवाय वाराणसी आणि अंदमान बेटांवर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सरासरी २० टक्क्यांनी वाढली. आंतरराष्ट्रीय पर्यटनात व्हिएतनाम हे सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण ठरले. पर्यटकसंख्येत १३३ टक्क्यांची वाढ झाली. देशांतर्गत पातळीवर दिल्ली आणि बेंगळुरू ही सोलो ट्रॅव्हलसाठी सर्वाधिक पसंतीची शहरे ठरली. दिल्लीहून हिमाचल प्रदेश, जयपूर आणि आग्रा, तर बेंगळुरूहून कूर्ग, उटी आणि कोडाईकनालकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. या वर्षी काही नव्या संकल्पना लोकप्रिय झाल्या. ऋषिकेश, कूर्ग आणि अल्लेपी येथे ‘कॅल्मकेशन’चा ट्रेंड दिसून आला. गोवा, पॉंडिचेरी आणि दार्जिलिंग ही पसंतीची ठिकाणे ठरली. स्पीती, अंदमान आणि लडाख येथे ‘डिजिटल डिटॉक्स’, तर बीर बिलिंग, लक्षद्वीप आणि औली येथे साहसी पर्यटकांची संख्या वाढली.या वर्षी काही अनोख्या बुकिंग्सही समोर आल्या. काही प्रवाशांनी ३६१ दिवस आधीच हॉटेल बुकिंग केले, तर ३ लाख लोकांनी रात्री ३ ते पहाटे ४ दरम्यान फ्लाइट्स बुक केल्या. बेंगळुरूमध्ये एका पर्यटकाने सलग ३० दिवस, तर कोलकात्यात २९ दिवस मुक्काम केला. सर्वात स्वस्त फ्लाइट ० रुपयांत, तर सर्वात स्वस्त हॉटेल ४८ रुपयांत बुक झाले. याउलट, सर्वात महाग फ्लाइटसाठी ४.४३ लाख रुपये, तर मालदीवमधील सर्वात महाग हॉटेल मुक्कामासाठी ४.४१ लाख रुपये पर्यटकांनी दिले. डिपार्चरच्या अवघ्या ४८ तासांआधी ३८ लाख फ्लाइट बुकिंग्स करण्यात आल्या. क्लिअरट्रिप अनपॅक २०२५ अहवालातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली, भारतीय पर्यटक आता अधिक स्मार्ट, डिजिटल प्रवासाकडे वळत आहेत आणि या बदलात जेन झी आघाडीवर आहे.

Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या