Digital Fraud News : ८ कोटींची फसवणूक, १२ पानांची चिठ्ठी अन् स्वतःवर गोळी; माजी IPS अमर सिंग चहल यांचा आत्महत्येचा प्रयत्न

पटियाला : पंजाबमधील एक धक्कादायक घटना समोर आली असून, राज्याचे माजी आयपीएस (IPS) अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. शेअर मार्केटमधील ८ कोटी १० लाखांच्या महाठगबाजीमुळे आलेल्या नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात मृत्यूशी त्यांची झुंज सुरू आहे.



सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून छातीत झाडली गोळी


मिळालेल्या माहितीनुसार, अमर सिंग चहल यांनी हा टोकाचा निर्णय घेताना स्वतःच्या सुरक्षारक्षकाची रायफल वापरली. त्यांच्याकडे स्वतःचे परवानाधारक शस्त्र नसल्याने त्यांनी हा मार्ग अवलंबला. गोळी थेट छातीत लागल्याने ती फुफ्फुसात अडकली होती. पटियालाचे एसएसपी वरुण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहल यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत नाजूक होती. त्यांच्यावर तब्बल तीन तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढण्यात आली असून, पुढील २४ तास त्यांच्यासाठी अत्यंत कळीचे आहेत.



डीजीपींच्या नावे १२ पानांची 'सुसाईड नोट'


पोलिसांना घटनास्थळी १२ पानांचे सविस्तर पत्र मिळाले आहे, जे पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP) गौरव यादव यांच्या नावाने लिहिण्यात आले आहे. या पत्रात चहल यांनी आपल्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील भीषण कारणांचा उलगडा केला आहे. 'एफ-७७७ डीबीएस वेल्थ इक्विटी रिसर्च ग्रुप' नावाच्या एका टोळीने त्यांची तब्बल ८ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. चहल यांनी पत्रात आरोप केला आहे की, सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा विश्वास संपादन केला. डीबीएस बँकेचे नाव सांगून शेअर ट्रेडिंग, आयपीओ अलॉटमेंट आणि क्वांटिटेटिव्ह फंडमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. चहल यांना विश्वास बसावा म्हणून एक खोटा 'डिजिटल डॅशबोर्ड' तयार करण्यात आला, ज्यावर त्यांना मोठा नफा झाल्याचे भासले. हाच नफा काढण्यासाठी टॅक्स, सेवा शुल्क आणि अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले.



तपासासाठी 'एसआयटी' नेमण्याची अंतिम मागणी


"मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे आणि मानसिकरित्या खचलो आहे," अशा शब्दांत चहल यांनी आपल्या वेदना मांडल्या आहेत. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असून, या पैशांचा मागोवा घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) किंवा केंद्रीय यंत्रणांमार्फत तपास करावा, अशी मागणी त्यांनी डीजीपींकडे केली आहे. पत्राच्या शेवटी त्यांनी कुटुंब आणि मित्रपरिवाराची माफी मागत आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.



सायबर गुंतवणुकीबाबत धोक्याचा इशारा


एका उच्चपदस्थ माजी पोलीस अधिकाऱ्याची अशा प्रकारे फसवणूक झाल्याने सायबर गुन्हेगारीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या घटनेने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून, डिजिटल गुंतवणुकीच्या नावाखाली चालणाऱ्या 'रॅकेट' विरोधात आता कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या