मोहित सोमण: अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड (Ultratech Cement) कंपनीला जीएसटी विभागाने ७८२.२ कोटीची नोटीस दिल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. व्याजासगट प्रलंबित ७८२.२ कोटीची रक्कम थकबाकी असल्याचे जीएसटी नियामकांनी (GST Regulator) कंपनीला कळवले असल्याचे कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले आहे. नेमक्या शब्दात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मूळ आदेशात ३९०९५५८१९४/रूपये इतकी कर दायित्व रक्कम, तसेच कर मागणीवरील लागू व्याज, अतिरिक्त व्याज २७६८२८९ आणि ३९०९५५८१९४ रूपये इतका दंड कायम ठेवण्यात आला असे म्हटले. १९ डिसेंबरला ही अंतरिम नोटीस कंपनीला बजावण्यात आली आहे. मात्र कंपनीने उपलब्ध असलेल्या कायदेशीर पर्यायाचा वापर करून यावर निर्णय घेऊ असेही कंपनीने निवेदनात म्हटले. जीएसटी टॅक्स भरण्यात प्रलंब, व प्रलंबित इनपूट टॅक्स क्रेडिट यामुळे हा एकत्रित दंड कंपनीवर लावण्यात आल्याचे समजते.
भारतातील मोठ्या सिमेंट कंपन्यापैकी एक म्हणून अल्ट्राटेक सिमेंट म्हणून ओळखले जाते. आदित्य बिर्ला समूहाची ही कंपनी असून शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी पाटणा येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (GST) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क (Central Excise Duty) विभागाच्या सहआयुक्तांनी पारित केलेला आदेश प्राप्त झाल्याचेही कंपनीने म्हटले. अल्ट्राटेक कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे २०० दशलक्ष टन आहे. उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक २०१८-२०१९ व २०२२-२३ दरम्यानचे हे प्रकरण आहे. आर्थिक स्थिती मजबूत आल्याचे यापूर्वी स्पष्ट झालेले असताना कंपनीच्या विक्रीतही इयर ऑन इयर बेसिसवर २०.३% वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते.
अल्ट्राटेकने म्हटले आहे की, या कर मागणीमुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा आर्थिक स्थितीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होईल असे त्यांना वाटत नाही. आज दुपारी २.१८ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२७% वाढ झाल्याने शेअर ११५२७ रूपयांवर व्यवहार करत आहे.