धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड मजुरांना उडवले. या अपघातात सहा ऊसतोड मजूर जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी ऊसतोड कामगारांना अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. कार चालक फरार आहे. पोलीस का चालकाला शोधत आहेत. फरार चालकाविरोधात हिट अँड रन प्रकरणी कायदेशीर कारवाई होणार आहे.
अपघातात जखमी झालेले ऊसतोड मजूर कळंब तालुक्यातील मंगरूळ गावचे आहेत. अपघाताची माहिती मिळताच मजुरांच्या नातलगांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली आहे.
सर्व जखमी मजूर हे आदिवासी पारधी समाजाचे असल्याचे समजते. अपघातग्रस्त वाहनावर लातूर जिल्ह्यातील पासिंग नंबर असल्यामुळे फरार झालेला चालक मूळचा लातूर जिल्ह्यातील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.