किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट’च्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या तब्बल २९ मजुरांचे दहशतवादी संबंध आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पडताळणीत समोर आले असून, यामुळे प्रकल्पस्थळी मोठा धोका निर्माण झाला आहे.


१ नोव्हेंबर रोजी किश्तवाडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नरेश सिंह यांनी प्रकल्पाचे काम करणाऱ्या 'मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड'च्या व्यवस्थापनाला एक पत्र लिहिले आहे. पोलिसांनी केलेल्या सुरक्षा पडताळणीनुसार, प्रकल्पावर कार्यरत असलेल्या ५ मजुरांचे थेट दहशतवाद्यांशी नातेसंबंध आहेत. तपासणीत असे आढळले की, एका कर्मचाऱ्याचा काका हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी मोहम्मद अमीन आहे. प्रकल्पातील इतर दोन मजूर हे याच दहशतवाद्याचे सख्खे भाऊ आहेत. एका कर्मचाऱ्याचे वडील माजी दहशतवादी असून त्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर दुसऱ्या एका मजुराचे वडील 'ओव्हर ग्राउंड वर्कर' म्हणून पोलिसांच्या दप्तरी नोंद आहेत. उर्वरित २४ कर्मचाऱ्यांवर विविध गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी 'मेघा इंजिनिअरिंग' कंपनीला या २९ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा संशयास्पद हालचाली करणाऱ्या मजुरांवर कडक पाळत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा

राजस्थानच्या फतेहपूर-माउंट अबूमध्ये तापमान ४ अंश सेल्सिअस

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह ८ राज्यांमध्ये शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीसह दाट

होमगार्ड पदासाठी पदवीधरांची गर्दी

भुवनेश्वर  : ओडिशात संबलपूर येथे होमगार्डच्या भरती परीक्षेसाठी ८ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची