Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या प्रकरणात जबरदस्त धक्का बसला आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (FIA) विशेष न्यायालयाने तोशाखाना-II भ्रष्टाचार प्रकरणात दोघांनाही १७-१७ वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.



काय आहे नेमके प्रकरण?



हे प्रकरण २०२१ मधील आहे, जेव्हा सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सने इम्रान खान यांना एक अत्यंत महागडा 'बुल्गारी ज्वेलरी सेट' भेट म्हणून दिला होता. नियमानुसार, अशा महागड्या भेटवस्तू सरकारी तोशाखान्यात जमा करणे किंवा त्यांची वाजवी किंमत मोजून स्वतःकडे ठेवणे बंधनकारक असते. तपासात असे समोर आले की, या दागिन्यांची मूळ किंमत ७ कोटी १५ लाख पाकिस्तानी रुपये होती, मात्र इम्रान खान यांनी ती अवघ्या ५८ लाख रुपयांमध्ये विकत घेऊन नियमांचे उल्लंघन केले. न्यायालयाने याला सरकारी विश्वासार्हतेशी केलेली फसवणूक आणि भ्रष्ट आचरण मानले आहे. विशेष न्यायाधीश शाहरुख अर्जुमंद यांनी रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये तयार केलेल्या विशेष कोर्ट रूममध्ये हा निकाल दिला. इम्रान खान यांना गुन्हेगारी विश्वासघातासाठी १० वर्षे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ७ वर्षे अशा एकूण १७ वर्षांच्या शिक्षेची सुनावणी झाली. याशिवाय, दोघांवर १ कोटी ६४ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.



इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ


इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून विविध गुन्ह्यांखाली तुरुंगात आहेत. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये अल-कादिर ट्रस्ट प्रकरणातही त्यांना १४ वर्षांची शिक्षा झाली होती. तोशाखाना-१ प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती, मात्र आता तोशाखाना-२ मध्ये सुनावलेल्या या मोठ्या शिक्षेमुळे त्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. इम्रान खान यांच्या कायदेशीर टीमने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment

‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि

तिरुपती गोविंदराजस्वामी मंदिरात मद्यपीचा धिंगाणा

तिरुपती : मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिरुपतीमधील श्री गोविंदराजस्वामी मंदिरात धिंगाणा घातल्याचा

'भाजपकडे पाहून संघाचे आकलन करणे चूक'

भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणवेशाचा वापर करण्यात येत असला आणि शारीरिक कसरतींना

विद्यार्थ्यांना दंडाऐवजी समाजसेवा करण्याचा न्यायालयाचा आदेश; जेईई मेन्स उत्तरपत्रिका फेरफार प्रकरण

नवी दिल्ली : संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन्स) २०२५ च्या उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचा आरोप असलेल्या दोन

Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा थरकाप! दोन चकमकीत १४ जणांचा खात्मा; मोस्ट वॉन्टेडसह २० जणांचे आत्मसमर्पण

रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी पुकारलेल्या युद्धाला शनिवारी मोठे यश आले. सुकमा आणि

Tamilnadu Shocker : भयंकर! घराला बाहेरून कडी लावून जोडप्याला जिवंत जाळले अन्... तिरुवनंतपुरममधील धक्कादायक घटना

तिरुवनंतपुरम : तामिळनाडूतील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातून एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. चेंगगम जवळील