होमगार्ड पदासाठी पदवीधरांची गर्दी

भुवनेश्वर  : ओडिशात संबलपूर येथे होमगार्डच्या भरती परीक्षेसाठी ८ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची परीक्षा विमानतळाच्या धावपट्टीवर घेण्याची वेळ प्रशासनावर आली. या परीक्षेचा ड्रोन व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. १६ डिसेंबर रोजी ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ८ हजार जण आले होते आणि पदांची संख्या १८७ इतकी होती. जमादारपाली विमानतळावर ही परीक्षा झाली. होम गार्डच्या भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार आल्याने ऐनवेळी गोंधळ उडाला. परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला. परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असलेल्या खोल्यांमध्ये परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रशासनाने विमानतळावरच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परीक्षा योग्यरितीने व्हावी यासाठी प्रशासनाकडून विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर जमादारपाली विमानतळाच्या धावपट्टीवर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार आल्यानंतरही शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता ही परीक्षा पार पडली. संबलपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, १६ डिसेंबरला संबलपूरमध्ये परीक्षा आयोजित केली होती. जवळपास १० हजार अर्ज आले आणि प्रत्यक्ष परीक्षेला ८ हजारांपेक्षा जास्त उमेदवार होते. शेवटी परीक्षा वेळेत व्हावी यासाठी विमानतळावर आयोजन करण्यात आले.
Comments
Add Comment

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर

धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री' तारपा सम्राट'