विश्वविजेत्या दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी

मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय साजरा करताना, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संघातील खेळाडूंसोबत संवाद साधला आणि त्यांच्या यशाचे कौतुक केले.


कोलंबोत नुकत्याच पार पडलेल्या 'फर्स्ट वुमेन्स टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर द ब्लाइंड २०२५'च्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा सात गडी राखून पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. हा दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिलाच टी-२० विश्वचषक होता आणि त्याचा मान भारताने मिळवला. या विश्वविजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी संघातील सदस्यांनी अनेक आव्हानांवर मात केली आहे. संघातील अनेक खेळाडू लहान खेड्यांतील, शेतकरी कुटुंबातील किंवा छोट्या शहरांतील वसतिगृहांतील आहेत. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.


महाराष्ट्राच्या गंगा कदम यांना या संघाचे उपकर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. नऊ भावंडांच्या शेतकरी कुटुंबातील गंगा लहानपणापासून दृष्टिहीन आहे. भविष्याचा विचार करून तिच्या वडिलांनी तिला अंधांसाठीच्या विशेष शाळेत दाखल केले. तिथे सुरुवातीला गंमत म्हणून क्रिकेट खेळायला लागली. आवाजाच्या आधारावर चेंडूचा माग काढणे, वेळेचा अंदाज घेणे अशी अनेक आव्हाने होती. मात्र २६ वर्षीय गंगाने चिकाटीनं सराव करत हे कौशल्य आत्मसात केले. मुख्यमंत्र्यांनी तिचे विशेष कौतुक केले.

Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने