महायुती झाली; आघाडीसाठी खलबत्ते !

सर्वच राजकीय पक्षांचा सोबत लढण्यावर भर


विरार : वसई - विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी युती-आघाडीचा मार्ग धरल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गटाने) युतीची अधिकृत घोषणा नुकताच केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासह आरपीआय (आठवले) यांना देखील सोबत घेण्यात येणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आले. तर दुसरीकडे बविआला सोबत घेऊन ही निवडणूक लढावी यासाठी, शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे या तीन राजकीय पक्षांनी बविआ कडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी दोन तीन दिवसात आघाडीबाबत सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे.


वसई - विरार महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांमध्ये आघाडी आणि महायुतीबाबत चर्चा होत आहेत.भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात दोन आठवड्यापूर्वीच युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर बुधवारी भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) युती करून महापालिका निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. या युतीबाबत शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजपचे नेत्यांमध्ये संयुक्त बैठक झाली. त्यानंतर आमदार राजन नाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांनी युतीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. युतीमध्ये भाजप - सेनेसह राष्ट्रवादी, आरपीआय (आठवले) आणि श्रमजीवी, आगरी सेना या संघटनांना महायुतीमध्ये सामील केल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. तर जागा वाटपाबद्दल स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील ते पुढे म्हणाले. शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वसई विरार दौऱ्यावर आहेत. या दिवशी शिवसेनेच्या जागा वाटपाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.दरम्यान, एकीकडे महायुतीची घोषणा झाली असताना दुसरीकडे आघाडी साठी देखील चर्चा सुरु आहेत. नुकताच शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांनी बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत पालिका निवडणूक आघाडी करून लढण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर बुधवारी मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा ठाकूर यांच्याकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. पालिकेवर सलग दोन टर्म बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. परिणामी महायुतीला रोखण्यासाठी स्थानिक बविआ सोबत हातमिळवणी करण्याकरिता शिवसेना ( उबाठा ), काँग्रेस आणि मनसे हे तीनही पक्ष उत्सुक आहेत. या आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाल्या असून, येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याचे बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. तसेच केवळ बहुजन विकास आघाडीच्या बॅनर वर लढण्यासाठी प्रत्येक प्रभागातून ३० ते ४० अर्ज प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी दोन-तीन दिवसांत आघाडीबाबत होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील