Navnath Ban : "सामनाचे भाकीत म्हणजे गणपत वाण्याची माडी!" अमेरिकन फायलींवरून पंतप्रधान बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना नवनाथ बन यांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : अमेरिकेतील गाजलेल्या 'एपस्टिन प्रकरणा'चा आधार घेत भारतातील पंतप्रधान बदलले जातील, अशा आशयाचा अग्रलेख 'सामना'तून प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या कल्पनारंजनाचा समाचार घेताना भाजप नेते नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) आणि 'सामना'वर जोरदार टीका केली आहे. "अफवांवर सरकार पडत नाही, ते मतपेटीवर उभं राहतं. पंतप्रधान बदलण्याचं तुमचं स्वप्न म्हणजे गणपत वाण्याच्या माडीसारखं आहे," अशा शब्दांत त्यांनी सामनाला आरसा दाखवला आहे.





लोकशाहीची थट्टा थांबवा!


पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा आधार घेत 'सामना'ने जे भाकीत केले आहे, ते केवळ हास्यास्पद असल्याचे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. "लोकशाहीत सरकारं अफवांवर नाही, तर जनतेच्या कौलावर चालतात. २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना स्पष्ट आणि ठाम कौल दिला आहे. परदेशातील कथित फायलींचा आधार घेऊन लोकशाहीची थट्टा करणे थांबवा," असा इशारा त्यांनी दिला.



पत्रकारिता की भीतीकथा?


सामना अग्रलेखातील भाषेवर आक्षेप घेताना बन म्हणाले की, "अग्रलेखात 'भूत', 'भुताटकी', 'मानगुटी' असे शब्द वापरणे ही पत्रकारिता नसून भीतीकथा सांगण्याचा प्रयत्न आहे. झाडाचं पान पडलं तरी आभाळ कोसळलं म्हणून ओरडणाऱ्या भित्र्या सशासारखी तुमची अवस्था झाली आहे."



पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडा!


भारताची अर्थव्यवस्था आणि जागतिक प्रतिमा उंचावत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत असल्याची टीका बन यांनी केली. "निवडणुकीतील पराभव आणि नेतृत्वाचा अभाव झाकण्यासाठी तुम्ही परदेशी प्रकरणांचा आधार घेत आहात. पराभवामुळे तुम्हाला जो मानसिक धक्का बसला आहे, त्यातून लवकर बाहेर पडा आणि लवकर बरे व्हा," असा खोचक सल्लाही त्यांनी उबाठा गटाला दिला आहे.


Comments
Add Comment

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबत चुकीची माहिती; महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळासमोर मांडली

शीव उड्डाणपूल येत्या पावसाळ्यात होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व -

तब्बल ४६ वर्षांनंतर भांडुप संकुला २००० दलशक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प येत्या एप्रिल २०२९ पर्यंत होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई :  भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अनधिकृतपणे जाहिरात फलक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारुन

मुंबईकरांसाठी बीडीडी घरांची मोठी सोडत; वरळी आणि नायगाव मध्ये सर्वाधिक घरांचे वितरण

मुंबई : मुंबईकरांसाठी बीडीडीने घरांची सोडत जाहीर केली आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ

गृहविभागाच्या अपर मुख्य सचिव पदी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

मुंबई : राज्याच्या गृहविभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला असून सनदी अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर