India vs South Africa, 5th T20I : अहमदाबादमध्ये तिरंगा फडकला! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय; मालिका ३-१ ने खिशात

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या २३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ८ बाद २०१ धावांवर मर्यादित राहिला. भारताचा हा १४ वा टी-२० मालिका विजय असून, २०२५ या वर्षाचा शेवट टीम इंडियाने दणक्यात केला आहे.



भारताचा विजय : ३० धावांनी विजय मिळवून मालिका ३-१ ने जिंकली.

स्टार परफॉर्मर्स : हार्दिक पंड्या (६३ धावा, १ विकेट), तिलक वर्मा (७३ धावा), वरुण चक्रवर्ती (४ विकेट).

विक्रमी धावसंख्या : भारताने ५ बाद २३१ धावांचा डोंगर उभारला होता.

फलंदाजीचा थरार : हार्दिक-तिलकची शतकी भागीदारी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात वादळी झाली. अभिषेक शर्मा (३४) आणि संजू सॅमसन (३७) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव (५) स्वस्तात बाद झाल्यानंतर, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या जोडीने आफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अवघ्या ४९ चेंडूत १०५ धावांची तुफानी भागीदारी केली. अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावत एकूण ६३ धावा केल्या. ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण करत ७३ धावांची झुंजार खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेचा पाठलाग : डिकॉकच्या विकेटने फिरला सामना


मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर क्विंटन डिकॉकने (६५ धावा, ३५ चेंडू) आक्रमक सुरुवात केली. त्याने हेंड्रिक्ससोबत ६९ धावांची सलामी दिली. मात्र, वरुण चक्रवर्तीने हेंड्रिक्सला बाद करून ही जोडी फोडली. डिकॉक जोपर्यंत खेळत होता, तोपर्यंत आफ्रिकेच्या आशा जिवंत होत्या. जसप्रीत बुमराहने डिकॉकला बाद करताच आफ्रिकेचा डाव गडगडला. यानंतर वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत एडन मार्कराम आणि डोनोव्हन फरेरा यांना सलग चेंडूंवर बाद करून आफ्रिकेचे कंबरडे मोडले. डेव्हिड मिलर (१८) बाद झाल्यावर भारताचा विजय निश्चित झाला.

 
Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील