भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारताने एक असामान्य आणि चिंताजनक पॅटर्न नोंदवला आहे. बंगालच्या उपसागरात सातत्याने मोठ्या संख्येने बांगलादेशच्या मासेमारी नौका भारतीय जलसीमेत प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे.


१५ डिसेंबर रोजी हा तणाव अधिक तीव्र झाला, जेव्हा बांगलादेश नौसेनेच्या एका गस्ती जहाजाने १६ भारतीय मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॉलरला धडक दिली. या धडकेमुळे ट्रॉलर उलटला आणि मच्छिमारांचे प्राण धोक्यात आले. सुदैवाने सर्व मच्छिमारांना वाचवण्यात यश आले. ही घटना फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये भारतविरोधी वातावरण तापले असताना घडल्याने तिचे गांभीर्य अधिक वाढले आहे.


शेख हसीना सरकारच्या सत्तांतरानंतर मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारने विशेषतः बंगालच्या उपसागरात आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. यूनुस यांनी यापूर्वी संपूर्ण क्षेत्रातील महासागराचा संरक्षक बांगलादेश असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यामुळे भारताच्या धोरणात्मक व सागरी सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.


या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या जवळ मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छिमारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी ही चिंता आणखी वाढली, जेव्हा पश्चिम बंगालमधील १६ मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या भारतीय ट्रॉलरला सीमेजवळ बांगलादेश नौसेनेच्या जहाजाने धडक दिल्याचा आरोप करण्यात आला.


संबंधित बांगलादेशी जहाजाने रात्रीच्या वेळी आपली दिवे बंद ठेवले होते. त्यामुळे भारतीय ट्रॉलरला ते जहाज वेळेत दिसले नाही आणि अपघात घडला, असा दावा केला जात आहे. या घटनेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सागरी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, भारत सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला जात असून सागरी सीमांवरील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याचा विचार सुरू आहे. या घडामोडींमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नव्या तणावाची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत

Indian Railways : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! वेटिंग आणि RAC तिकिटांचे नियम बदलले, आता रात्री झोपण्यापूर्वीच...रेल्वेची मोठी अपडेट वाचा

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा रेल्वे

महाराष्ट्रभूषण राम सुतार यांचे निधन; दिल्लीत अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वनजी सुतार यांचे