दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना मारुती सुझुकीकडून खुषखबर- मारूती वॅगनआर स्विव्हल सीट पर्यायासह बाजारात उपलब्ध

मुंबई: मारूती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनीने मोठी घोषणा केली आहे. दिव्यांगासाठी ही योजना फळास ठरू शकते कारण बुधवारी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी एक पाऊल म्हणून मारूतीने स्विव्हल सीटच्या पर्यायासह वॅगनआर सादर बाजारात आणल्याची घोषणा नुकतीच केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना अधिक सोयीसुविधा देण्यासाठीस्विव्हल सीट्स डिझाइन केल्या आहेत असे कंपनीने सांगितले. 'हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय १० शी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश असमानता कमी करणे आहे' असे कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे.'


स्विव्हल सीट्समुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होईल. वॅगनआर हे भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या दहा मॉडेल्सपैकी एक आहे आणि हे सुलभीकरण व वैशिष्ट्य मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी ते आदर्श आहे' असे मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी ताकेउची यांनी सांगितले.


कंपनीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, वॅगनआर स्विव्हल सीट किटची ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) येथे सुरक्षा चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि ते सगळ्या त्या आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन कंपनी करते, असे कंपनीने नमूद केले.


सुझुकी ग्रुपच्या 'बाय युवर साइड' या कॉर्पोरेट घोषणेपासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय १० शी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश सध्याची असमानता कमी करणे आहे हे उद्दिष्टही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.


उपलब्ध माहितीनुसार, या उपक्रमासाठी मारुती सुझुकीने NSRCEL-IIM बंगळूरच्या स्टार्टअप इनक्यूबेशन प्रोग्राम अंतर्गत बंगळूर स्टार्टअप TRUEAssist Technology Private Limited सोबत भागीदारी केली आहे. ग्राहक मारुती सुझुकी अरेना डीलरशिपवर स्विव्हल सीट रेट्रो फिटमेंट किट म्हणून ग्राहक ऑर्डर करू शकतात. ही सीट नवीन वॅगनआर मॉडेल्समध्ये बसवता येईल किंवा सध्याच्या वाहनांमध्ये रेट्रोफिट करता येईल असे कंपनीने म्हटले.

Comments
Add Comment

मुंबईच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता

मुंबई : राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. त्यातच मुंबई शहर आणि

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट; ११ जवान जखमी

बिजापूर/रायपूर : रविवारी २५ जानेवारीला छत्तीसगडमधील बिजापूरच्या उसुर पोलीस स्टेशन परिसरात आयईडी स्फोट झाला. इथे

हिंदू समाजाला तीन मुले होण्यापासून कोणीही रोखलेलं नाही; डॉ. मोहन भागवत

मुझफ्फरपूर : मुझफ्फरपूर येथील सामाजिक समरसता चर्चासत्र बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, भारतात विविधता आहे,

Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप; ‘या’ बँका राहणार बंद

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Strike) ५ दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात