निधी संपवण्यासाठी महापालिका शाळांच्या मुलांची सहल; महापालिकेच्या स्थायी समितीने दाखवला प्रशासनाला इंगा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने अत्यंत घाईघाईत स्थायी समिती मंजुरीसाठी सादर केला. परंतु हा प्रस्ताव मुलांच्या सहलीपेक्षा यासाठी मंजूर निधी ३१ मार्च पूर्वी वापरण्यासाठी आणि पर्यायाने संस्थेची तिजोरी भरण्यासाठी असल्याचे स्पष्ट आरोपच करत हा प्रस्ताव राखून ठेवत प्रशासनाला आणखी एक इंगा दाखवला


स्थायी समितीच्या पटलावर शेवटच्या क्षणाला महापलिका शाळांमधील मुलांच्या सहलीचा प्रस्ताव मांडण्यात आल्यामुळे सभागृहनेते गणेश खणकर यांनी याला हरकत घेत हा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई न करता राखून ठेवण्याची सूचना केली. यावर शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी पाठिंबा देता इयत्ता ४थी आणि इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी काढण्यात येणाऱ्या सहलीसाठी एकमेव संस्थेची निवड कशी केली असा सवाल उपस्थित केला. तसेच तब्बल ६६०० मुलांना घेवून जाणारी ही संस्था सुपरमॅन आहे का असा सवाल करत या मुलांची काळजी कोण घेणार अशी चिंता व्यक्त केली. सध्या परिक्षांचे दिवस आहेत, अशात या मुलांना कोणते पालक पाठवणार असाही सवाल केला. तर याला यामिनी जाधव यांनी पाठिंबा देत केवळ प्रत्येक मुलांमागे ७३० रुपये देण्यात येणार आहे मग त्यांना खायला काय देणार याचाही कुठेही उल्लेख नसल्याचे सांगितले. तर अश्रफ आझमी यांनी आचारसंहितेमुळे सहल आयोजित करता आली नसल्याचे सांगत शिक्षण विभागाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. तर एमआयएमचे सलीम कुरेशी यांनी ६७०० हजार मुलांपैंकी १० ते २० टक्के मुले न आल्यास त्याचे पैसे संस्थेकडून परत घेतले जाणार का असा सवाल केला. तर डॉ सईदा खान यांनी सध्या दहावीच्या परिक्षा सुरु असून शिक्षक या मुलांच्या परीक्षा सांभाळून या सहलीचे आयोजन कसे करणार असा सवाल केला. त्यामुळे अशाप्रकारची मुलांची सहल असेल तर आधी जावून पाहून मगच त्यानुसार मुलांच्या सहलीचे आयोजन करावे अशी सूचना केली. तर मनसेच यशवंत किल्लेदार यांनी ही सहल ०९ ते २७ मार्च दरम्यान काढली जाणार असून त्यातील शनिवार आणि रविवार वगळता उर्वरीत दहा दिवस आहेत. यात प्रत्येक दिवशी २ हजार विद्यार्थी गृहीत धरले तर २० हजार मुले होता, मग उर्वरीत मुलांचे काय करणार असा सवाल त्यांनी केला. यावर अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सर्व सदस्यांनी उपस्थित केलेला मुद्दयांची दखल घेवून माहिती सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विशेष म्हणजे या प्रस्तावामध्ये सहलीसाठी नियुक्त श्रीयांश एंटरप्रायझेस या संस्थेला ३१ मार्च २०२६ पूर्वी संबंधित लेखा विभागार्फत अधिदानाची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे नमुद केले.त्यामुळे तरतूद निधी संपवण्यासाठी आणि ठराविक एकमेव संस्थेला काम देण्याचा प्रशासनाचा डाव उघडकीस आल्यामुळे सभागृहनेेते आणि शिक्षण समिती अध्यक्षा यांनी याला आक्षेप घेत प्रशासनाचे मनसुबे उधळून लावले.



कुठल्या ठिकाणी किती मुले जाणार सहलीला


 

भायखळा राणीबाग : इयत्ता ४थी, एकूण मुले ३६,७२०


सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ३१ लाख ३३ हजार ६००


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली : इयत्ता ७वी, २९,०६४ व माध्यमिक ८४६


सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ०९ लाख ३७ हजार रुपये

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा