मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय


मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता, शहराची अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात १०४ मीटर उंचीची अत्याधुनिक शिडी दाखल होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.


नियम ९२ अन्वये आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सामंत बोलत होते. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असून येथील वाढत्या नागरीकरणाच्या गरजा ओळखून अग्निशमन यंत्रणा अधिक प्रगत करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या ९४ मीटर उंचीपर्यंतची शिडी उपलब्ध आहे. मात्र, चेन्नईमध्ये सध्या देशातील सर्वाधिक उंच १०४ मीटरची शिडी वापरात आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबईसाठी त्यापेक्षाही अधिक प्रगत तंत्रज्ञानाची शिडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.


उंच इमारतींच्या सुरक्षेबाबत बोलताना सामंत म्हणाले की, "उंच इमारतींमध्ये आता आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये फायर स्टेअरकेस, फायर लिफ्ट, स्प्रिंकलर प्रणाली, अलार्म व्यवस्था आणि फायर एस्केप यांसारख्या सुविधांचा समावेश असतो. या सर्व उपाययोजनांची पूर्तता झाल्याची खात्री पटल्यानंतरच महानगरपालिका आणि अग्निशमन दलातर्फे इमारतींना अंतिम परवानगी दिली जाते." आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्यास सरकारचे प्राधान्य असून, भविष्यात अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ही यंत्रणा अधिक बळकट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर