दहिसरमधून उबाठाला व्हाईट वॉश करण्याची महायुतीला संधी

िचत्र पालिकेचे : दहिसर िवधानसभा 


सचिन धानजी


मुंबई : दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच निवडणूक लढली नाही आणि यांच्याशिवाय कुणीच जिंकून यायचे नाही. परंतु यंदा प्रथमच घोसाळकर कुटुंबाशिवाय निवडणूक लढली जाणार आहे. आरक्षणाने घोसाळकर यांना या प्रभागातून हद्दपार केल्यामुळे यंदा काँग्रेसच्या उमेदवार शीतल म्हात्रे यांच्यासमोर कोणतेच आव्हान राहणार नाही. मात्र दहिसरमध्ये शिवसेनेच्या वाट्याला तीन जागा येणार असून भाजपच्या वाट्याला मागील निवडून आलेल्या तीनच जागा कायम राहण्याची शक्यता आहे.
दहिसर विधानसभेमध्ये भाजपाचे तीन नगरसेवक, तर शिवसेनेचे दोन आणि उबाठा एक अशाप्रकारे सहा नगरसेवक आहेत. त्यामुळे या मतदार संघात उबाठाचा एकमेव नगरसेवक असून तो नगरसेवकही आता भाजपात आला आहे. त्यामुळे या मतदार संघातून उबाठाचा व्हाईट वॉश देण्याची संधी महा युतीला प्राप्त झाली आहे. त्यामुळे उबाठा या विधानसभेतून व्हाईट होते की एक तरी जागा निवडून हे व्हाईट वॉश होण्यापासून वाचते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, मनसेसोबत युती झाल्यास उबाठाला यासाठी जागा सोडण्यासाठी एकमेव प्रभाग नसेल. त्यामुळे मनसेचे पुनर्वसन दहिसरमध्ये कसे करावे हा उबाठासमोरील मोठा प्रश्न असेल.


लोकसभा निवडणुकीत दहिसर विधानसभेतून झालेले मतदान


पीयूष गोयल भाजप : १,०८ ४१९


भूषण पाटील, काँग्रेस : ४६,१७२


दहिसर विधानसभेतील निकाल


मनीषा चौधरी, भाजप : ९८,५८७


विनोद घोसाळकर, उबाठा : ५४,२५८




  • प्रभाग क्रमांक १ (ओबीसी महिला)
    हा प्रभाग सर्व सामान्य महिला करता आरक्षित होता. परंतु आता हा प्रभाग ओबीसी महिला करता आरक्षित झाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना या प्रभागातून बाहेर व्हावे लागणार आहे. त्यामुळे घोसाळकर कुटुंबाशिवाय या प्रभागाात उमेदवार असेल. या प्रभागातून उबाठाकडून अद्यापही उमेदवाराची चर्चा नसली तरी काँग्रेसकडून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेच्यावतीने राम यादव यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे या मतदार संघात शिवसेना विरुध्द उबाठा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे.

  • प्रभाग क्रमांक २(महिला)
    हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्ग म्हणून राखीव होता, या प्रभागातून भाजपाचे जगदिश ओझा हे निवडून आले होते. परंतु आता हा प्रभाग महिला आरक्षि झाल्याने याठिकाणी सुरुवातील पुनम पांडे आणि वृषाली बागवे यांची नावे चर्चेत होती, परंतु दोनच दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेच्या तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे या महिला राखीव प्रभागातून भाजपाकडून तेजस्वी घोसाळकर यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. त्यामुळे उबाठाकडून उत्तम पडवळ हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात अशी माहिती मिळत आहे.

  • प्रभाग क्रमांक ६ (ओबीसी महिला)
    हा प्रभाग ओबीसी आरक्षित होता, त्यामुळे उबाठाच्या तिकीटावर हर्षद कारकर हे निवडून आले होते. परंतु हा प्रभाग आता ओबीसी महिला आरक्षित झाला आहे. त्यामुळे हर्षद कारकर यांना आपल्या पत्नी दिक्षा कारकर यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची वेळ आली आहे. हा प्रभाग कायमच कारकार कुटुंबाचा राहिलेला आहे. कारकर कुटुंबावर येथील मतदारांचा मोठा प्रभाव आहे. त्यातच दिक्षा कारकर या युवा सेनेचा पदाधिकारी राहिल्या होत्या, तसेच त्यांचे वक्तृत्वही चांगले असल्याने आणि महिलांसह मतदारांमधील जनसंपर्क चांगला असल्याने शिवसेनेकडून हर्षद कारकर च्या अनुपस्थितीत दिक्षा एक चांगला पर्याय शिवसेनेला उपलब्ध झाला आहे. तर उबाठाकडून उज्ज्वला सुर्वे आणि संगीता वेंगुर्लेकर यांचीही नावे चर्चेत आहेत. परंतु काँग्रेसचा कोणत्याही उमेदवाराचे नाव चर्चेत नाही. मा़त्र, या प्रभागात शिवसेना विरुध्द उबाठा अशीच लढत होताना पहायला मिळणार आहे.

  • प्रभाग ७ (सर्वसाधारण)
    हा प्रभाग सर्वसामान्य महिला करता राखीव होता. या प्रभागातून शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे या निवडून आल्या होत्या, परंतु आता पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झाला आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यास शीतल म्हात्रे किंवा अक्षय राऊत आणि कुणाल ठाकूर यांचीही नावे चर्चेत आहे. तर प्रभागातून विनोद घोसाळकर हे आपल्या दुसऱ्या सुनेला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहे. विनोद घोसाळकर यांच्या स्नुषा पुजा घोसाळकर यांचे नाव उबाठाकडून चर्चेत आहे तर काँग्रेसकडून आशिष फर्नाडिस यांचे नाव चर्चेत आहे. जर पुजा घोसाळकर यांना उमेदवारी मिळाल्यास शेवटच्या क्षणात शीतल म्हात्रे निवडणूक लढवू शकतात असे बोलले जात आहे.

  • प्रभाग क्रमांक ८ (ओबीसी महिला)
    हा प्रभाग सर्वसामान्य प्रवर्गाकरता राखीव होता, या प्रभागातून भाजपाचे हरिष छेडा हे विजयी झाले होते. परंतु आता हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाला आहे. त्यामुळे भाजपाचे हरिष छेडा यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. या प्रभागातून दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी या आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहेत. अंकिता चौधरी यांचे नाव या प्रभागात भाजपाच्यावतीने चर्चेत आहे. तर भाजपातून दिपा पाटील यांचेही नाव चर्चेत असल्याचे एेकायला मिळते. मात्र, या प्रभागातून उबाठा आणि काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराची कोणतीही रचर्चा नाही. या प्रभागा भाजपा विरुध्द
    उबाठा अशीच थेट लढत होण्याची शक्यता आहे.

  • प्रभाग क्रमांक १० ( ओबीसी)
    हा प्रभाग ओबीसी प्रवर्गाकरता होता. या प्रवर्गातून भाजपाच्यावतीने जितेंद्र पटेल हे विजयी झाले होते. तर हा प्रभाग पुन्हा ओबीसी झाल्याने पुन्हा एकदा जितेंद्र पटेल यांनी आरक्षणात प्रभाग कायम राखला आहे. त्यामुळे भाजपाच्यावतीने जितेंद्र पटेल तर उबाठाकडून मिलिंद म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे, तर काँग्रेसकडून लौकिक सुत्राळे यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपा विरुध्द उबाठा अशी थेट लढत
    होणार आहे.

Comments
Add Comment

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती, मंत्री नितेश राणेंची माहिती

मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक

मोदींची कबर खोदण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची कबर जनता खोदेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें

काँग्रेसची टीका देश प्रेमातून नाही पाकिस्तान प्रेमातून पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ

Tata Sierra Record Bookings: पहिल्या दिवशी टाटा सिएराला तुफान प्रतिसाद, १ दिवसात 'इतक्या' गाड्यांचे बुकिंग

मोहित सोमण:टाटा सिएरा (Tata Sierra) काल १६ डिसेंबरपासून नवी विक्री नोंदणी (Sales Registration) सुरु केले होते. त्यामुळे नुकत्याच

घरगुती गुंतवणूकदारांना रुपयाचा सुखद दिलासा! रूपयांचे एका सत्रात १% पातळीवर जोरदार पुनरागमन 'ही' आहे कारणमीमांसा

मोहित सोमण: भारतीय बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांनी वाढवलेली मोठी खरेदी व आरबीआयने डॉलर रूपया विनिमयात चालू

अक्झो नोबेलचा शेअर धडाड! इंट्राडे १५% कोसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (Akzo Nobel India Limited) कंपनीचे शेअर आज जोरदार कोसळले आहेत. एका प्रसारमाध्यमांनी

गांधी घराण्याचे निष्ठावंत दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार! निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा काँग्रेसला दणका

हिंगोली: गांधी घराण्याचे निष्ठावंत दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार