साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात अलीकडेच एमडी ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतरच पाचगणीत कोकेन विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी पकडले. पोलिसांनी पकडलेले दहा जण हे मुंबईतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.महम्मद नावेद सलिम परमार (रा. भेंडी बाजार, मुंबई), सोहेल हशद खान (रा. पी.बी. मार्ग, मुंबई), महम्मद रिझवान अन्सारी, वासिल हमीद खान, अली अजगर सादिक राजकोटवाला (रा. नागपाडा, मुंबई), महम्मद साहिल अन्सारी (रा. शिलाजी टॉवर, मुंबई सेन्ट्रल), जिशान इरफान शेख (रा. भायखळा, मुंबई), सैफ अली कुरेशी (रा. मज्जीद गल्ली, मुंबई), महम्मद उबेद सिद्दिकी (रा. भेंडीबजार, मुंबई) आणि राहिद मुख्तार शेख (रा. ग्रॅन्ट रोड, मुंबई) या सर्वांना पोलिसांनी पकडले आहे. पाचगणीतल्या ड्रग्स रॅकेटचा मुंबईशी असलेला संबंध जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.