बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी वाढत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. दरम्यान सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने निर्माण झालेल्या या खाऱ्या पाण्याच्या सरोवरात कमळजा देवीचे मंदिर आता १५ फूट पाण्यात बुडाले आहे. महत्त्वाचे म्हणजे सरोवरातील कमळजा देवीचे मंदिर, जे कधीच पाण्याखाली गेले नव्हते, आता पूर्णपणे बुडाले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे सरोवर अभ्यासक सचिन कापूरे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी पुरातत्व विभागाकडे पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. या निर्माण झालेल्या कुतूहलाबाबत पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन निष्कर्ष काढावा अशी मागणी निसर्ग प्रेमी श्रीकांत भुसारी यांनी केली आहे. जिल्ह्यातील सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकही या बदलामुळे आश्चर्यचकीत झाले आहेत.
मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू झाली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत ...
सरोवराच्या पाण्याची पातळी का वाढत आहे, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विश्वप्रसिद्ध असलेल्या या सरोवराच्या अभ्यासासाठी परदेशातून असंख्य पर्यटक आणि वैज्ञानिक येतात. पण खऱ्या पाण्याच्या या सरोवरात मासे का मिळत आहेत, पाण्याची पातळी का आणि कुठून वाढत आहे, हे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. या संवेदनशील विषयावर सखोल संशोधन करण्याची तीव्र गरज आहे. मात्र, संबंधित पुरातत्व विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, ही खेदाची बाब आहे.