फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही ऐतिहासिक खेळी करुनही वैभवला आणखी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.


भारताने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत ५० षटकांत सहा बाद ४३३ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या यूएईने ५० षटकांत सात बाद १९९ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना २३४ धावांनी जिंकला. या सामन्यात वैभवच्या वादळी खेळीमुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. पण एवढा वादळी खेळ करुनही वैभवला आणखी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.


आयसीसीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूने १५ वर्षे वयाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे. वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला आहे. वैभवला वयाची अट पूर्ण करण्यासाठी आणखी किमान १०१ दिवस थांबावे लागणार आहे. या एका नियमामुळे वैभव सूर्यवंशी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाही.


वैभव हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. वय त्याच्या बाजूने आहे. थोडा संयम बाळगला आणि खेळात सातत्य ठेवले, आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत राहिला तर वैभव लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल, असे मत क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय

भारत - दक्षिण आफ्रिकेचा आज धर्मशालात महामुकाबला

मालिकेवरील वर्चस्वासाठी चुरस; १-१ बरोबरीमुळे महत्त्व मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२०