रणवीर सिंगमुळे पीव्हीआर आयनॉक्स शेअर थेट ७% उसळला!

मोहित सोमण: रणवीर सिंहचा सध्या धुमाकूळ घालत असलेला धुरंधर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगल्या प्रकारे चालत असल्याने गुंतवणूकदारांनी पीव्हीआर आयनॉक्स शेअर इंट्राडे ७% पातळीवर उसळला होता. दुपारी ३.२२ पर्यंत अखेरच्या सत्रात शेअर्समध्ये ३.५६% वाढ झाल्याने प्रति शेअर दरपातळी १०८९.३० रूपयावर सुरू आहे. धुरंधर चित्रपट सध्या चित्रपट समीक्षाकारांनी डोक्यावर घेतल्याने चित्रपटाने रविवारपर्यंत ४३ कोटी रूपयांचा गल्ला जमवला होता. शुक्रवारी २८ कोटी, शनिवारी ३२ व रविवारी ४३ कोटींचा गल्ला चित्रपटाने जमवला असून आतापर्यंत २०७.२५ कोटींचा गल्ला जमवल्याचे चित्रपट समीक्षक व विश्लेषक सांगत आहेत. त्यामुळे चित्रपटगृहाला पुन्हा एकदा चांगले दिवस सुरू झाल्याचे द्योतक म्हणून गुंतवणूकदारांनी शेअरला कौल दिला.


कोरोना काळानंतर ओटीटी व्यासपीठांचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाल्याने शेअर बाजारात मनोरंजन कंपनीच्या शेअर्समध्ये ढिलाई गेल्या ३ वर्षात पहायला मिळाली. मात्र पुन्हा एकदा चांगला कंटेंट, चांगल्या सुविधा, चित्रपटातील सुधारलेले विपणन (Marketing) व पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्याने चित्रपट गृहात पुन्हा एकदा प्रेक्षक वळत आहेत. याच क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या पीव्हीआर आयनॉक्सने गेल्या वर्षी चांगली नैसर्गिक (Organic Growth) वाढ नोंदवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा कंपनीला चांगला कौल मिळाल्याने आज पीव्हीआर शेअर उसळलेला होता.


प्रादेशिक पातळीवर धुरंधर चित्रपटाने मुंबई, दिल्ली एनसीआर, बंगळूर आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये मोठी कमाई केली आहे. या महानगरात देशभरातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या नोंदवली जाते परदेशी बाजारपेठेतही हीच गती दिसून आली आहे. अमेरिका, यूके, यूएई, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधून मिळालेल्या कमाईमुळे सातव्या दिवसापर्यंत चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. बॉक्स ऑफिसवर मर्यादित स्पर्धा आणि देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी यामुळे हा चित्रपट देशभरातील पडद्यांवर आपले वर्चस्व गाजवत आहे.


हा चित्रपट आता रणवीर सिंगचा गेल्या जवळपास सात वर्षांतील सर्वात मोठा हिट ठरला आहे ज्याने २४०.३० कोटी रुपये कमावलेल्या 'सिम्बा'ला मागे टाकले आहे.तसेच, त्याने 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'ला मागे टाकून दिग्दर्शक आदित्य धर यांचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे. सध्या 'धुरंधर' हा रणवीर सिंगचा देशांतर्गत कमाईच्या बाबतीत 'पद्मावत'नंतरचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट आहे, ज्याने ४०० कोटी रुपये कमावले होते. तज्ञांना अपेक्षा आहे की हा चित्रपट आपली कमाई सुरूच ठेवेल आणि संभाव्यतः 'पद्मावत'च्या कमाईच्या जवळ पोहोचेल.


गेल्या १ महिन्यात कंपनीचा शेअर २.०१% घसरला असून गेल्या सहा महिन्यांपासून १२.३२% उसळला होता. तर गेल्या वर्षभरात कंपनीचा शेअर २६.४२% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

इंडिगो फ्लाईटला हवेत पक्षाची धडक! पायलटच्या प्रसंगावधानाने वाचले २१६ लोकांचे प्राण

वाराणसी : हवेत उड्डाण करत असताना इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाला पक्षाची जोरदार धडक बसल्याची गंभीर घटना

शेअर बाजाराचा टांगा पलटी घसरण फरार! शेवटी ८०० अंकाने बाजार रिकव्हर सेन्सेक्स ३०१.९३,निफ्टी १०६.९५ अंकाने रिबाऊंड'

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३०१.९३ अंकांने

'व्हायब्रंट गुजरात'अंतर्गत रिलायन्स,अदानी, ज्योती सीएनसी,वेलस्पून समुहाकडून एकत्रित १० लाख कोटीहून अधिक गुंतवणूकीची घोषणा

मुंबई: उद्योजक व उद्योगपतीनी मोठ्या प्रमाणात आपले लक्ष्य गुजरात राज्यात केंद्रित केले आहे. 'वायब्रंट' गुजरात

महाराष्ट्र झेडपी निवडणूक..!

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत दाखल याचिकांवर आज (१२ जानेवारी २०२६)

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६; देशाच्या अर्थकारणाची दिशा ठरवणार

मुंबई : देशाच्या राजकीय आणि आर्थिक हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं संसदचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

भारत व जर्मनी यांचा व्यापार ५० अब्ज डॉलर पार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ (Friedrich Merz) यांनी नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर