मुंबई (प्रतिनिधी): आजवर कधीही रेल्वेने प्रवास न केलेल्या आणि मुंबईही न पाहिलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील ओंदे येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील १५० आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी प्रथमच मुंबई अनुभवली. ग्रामीण व आदिवासी समुदाय जनसंपर्क कार्यक्रम अंतर्गत काश फाऊंडेशनच्यावतीन मुंबई शैक्षणिक व एक्स्पोजर टूर आयोजित केली. सनदी अधिकारी निधी चौधरी, निवृत्त सनदी अधिकारी विवेक अत्रेय,आयपीएस अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, सीमाशुल्क विभागाचे अधिकारी समीर वानखेडे आदींनी या आदिवासी मुलांना संबोधित करत मार्गदर्शन केले.
काश फाउंडेशन, मुंबई यांनी झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट , केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहयोगाने हा दौरा आयोजित केला होता. या विद्यार्थ्यांनी पालघर येथून फ्लाइंग राणी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण केल्यानंतर मुंबई सेंट्रल येथे उतरल्यानंतर सर्वांनी प्रथम गिरगाव चौपाटी येथे भेट देऊन समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अनुभवले. यानंतर विद्यार्थ्यांनी “समावेशक या विषयावरील २०वी राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग नोंदवला. त्यानुसार नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांच्या २१व्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग घेतला. यात थायलंडचे कॉन्सुल जनरल, इजिप्तच्या कॉन्सुल जनरल, अर्जेंटिनाच्या डेप्युटी कॉन्सुल जनरल, तसेच भारतातील अधिकारी तज्ज्ञांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले.
संख्येचे व्यवस्थापन करणारी प्रणाली महापालिकेकडून विकसित मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील भटक्या श्वानांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यादृष्टीकोनातून ...
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), मुंबई यांच्या संचालिका निधी चौधरी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी संदेश दिला. भारताच्या समृद्ध आधुनिक कलाविश्वाचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एनजीएमए ला अवश्य भेट द्यावी, असेही आवाहन केले. आजची तरुण पिढी संधींनी भरलेल्या अशा महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जिज्ञासा जपा, शिकत रहा आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करा, असे आवाहन माजी सनदी अधिकारी विवेक अत्रेय यांनी केले. काश फाऊंडेशनचे प्राध्यापक डॉ. अवकाश जाधव यांनी “सरदार वल्लभभाई पटेल यांची विलक्षण परंपरा” या विषयावर मुख्य व्याख्यान दिले.