नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या व्यक्त केली जात आहे. यादरम्यान कामगार मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. जोपर्यंत भविष्य निर्वाह निधीची कपात ही १५ हजार रुपयांच्या निश्चित वेतन मर्यादेनुसार होत राहील, तेपर्यंत हातात येणारा पगार कमी होणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर पीएफमधील कपात कायद्याने निश्चित केलेल्या वेतन मर्यादेनुसार झाली तर नवीन कामगार संहितेमुळे हातात येणारे वेतन कमी होणार नाही. पीएफमधील कपात ही १५ हजार रुपयांच्या वेतन मर्यादेनुसार होते आणि या मर्यादेच्या पुढील योगदान हे स्वेच्छिक आहे, अनिवार्य नाही. कामगार संहितेबद्दल २१ नोव्हेंबर २०२५ रोजी माहिती देण्यात आली तेव्हापासून अनेक कर्मचारी त्यांचे हातात येणारे वेतन कमी होईल अशी भीती व्यक्त करत होते. नवीन नियमांनुसार मूळ वेतन आणि संबंधित घटक हे एकूण वेतनाच्या ५० टक्के असावेत असे सांगतो, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ही भीती निर्माण झाली होती. अनेकांना वाटले की यामुळे त्यांचे पीएफ मधील योगदान अपोआप वाढेल आणि यामुळे त्यांना हातात मिळणारे वेतन कमी होईल. मात्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, हा निष्कर्ष चुकीचा आहे. नेमकं पीएफ कसा मोजला जातो यामध्ये याचे गूढ दडले आहे. नवीन व्याख्येखाली जरी कामागाराचे मूळ वेतन वाढले जरी असेल तरी, पीएफ मात्र १५ हजार रुपयांच्या निश्चित वेतन मर्यादेनुसारच मोजला जाईल.


एखादी कंपनी आणि कामगार हे जोपर्यंत जास्तीचे पीएफ योगदान देण्याचा पर्याय निवडत नाहीत तोपर्यंत हे बदलणार नाही. म्हणजेच बहुतांश पगारदार कर्मचारी ज्यांच्या पीएफची कमाल मर्यादा निश्चित आहे, त्यांच्या मासिक वेतनातून होणारी कपात बदलणार नाही. या सर्व प्रकार समजावून देण्यासाठी मंत्रालयाने एक उदाहरण दिले आहे. एखादा कर्मचारी ६० हजार रुपये महिना कमावतो तर मूळ वेतन + डीए = २० हजार रुपये, भत्ते = ४० हजार रुपये असे असले तरी पीएफ हा १५ हजार रुपयांवरच कापला जाईल, पूर्ण मूळ वेतनावर नाही.

Comments
Add Comment

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या